घरदेश-विदेशपाकिस्तानी सैनिकांच्या हाती आता नांगर; 10 लाख एकर शेतजमीन घेतली ताब्यात

पाकिस्तानी सैनिकांच्या हाती आता नांगर; 10 लाख एकर शेतजमीन घेतली ताब्यात

Subscribe

पाकिस्तान सध्या वाईट आर्थिक परिस्थितीतून जात आहे. प्रत्येक लहान-मोठ्या सुविधेसाठी तेथील लोक झगडत आहेत. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने कंबर कसली आहे.

नवी दिल्ली : दहशतवादाला खतपाणी घालणारा देश म्हणून ओळख असलेल्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या बिकट आहे. याचबरोबर तेथील राजकीय वातावरणसुद्धा उलथापालथीचे झाले आहे. याचदरम्यान मात्र, आता याच पाकिस्तानमधून एक वेगळे वृत्त समोर आले आहे. ते म्हणजे आता पाकिस्तानी सैनिक शेती करणार असून, तशी तयारीसुद्धा त्यांनी सुरू केली आहे. असे जरी असले तरी मात्र, या प्रकारामुळे आता तेथील राजकिय वर्तुळातून चिंतेचे सुरू उमटू लागले आहेत.(The plow is now in the hands of Pakistani soldiers 10 lakh acres of agricultural land taken into custody)

पाकिस्तान सध्या वाईट आर्थिक परिस्थितीतून जात आहे. प्रत्येक लहान-मोठ्या सुविधेसाठी तेथील लोक झगडत आहेत. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने कंबर कसली आहे. यासाठी देशातील 10 लाख एकरहून अधिक शेतजमीन ताब्यात घेतली आहे. आता या जमिनीवर पाकिस्तानी लष्कर शेती करणार आहे. तथापि, या निर्णयामुळे देशात लष्कराच्या व्यापक उपस्थितीबद्दल चिंता निर्माण झाली आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने पुढाकार घेतला आहे. यामध्ये ते आता नवीन अन्न सुरक्षा अभियानांतर्गंत स्वतःच शेती करणार आहे. हे काम सिव्हिल मिलिटरी इन्व्हेस्टमेंट बॉडीच्या माध्यमातून केले जाणार आहे. पाकिस्तानी लष्कराच्या म्हणण्यानुसार, या योजनेचा उद्देश देशातील भाडेतत्वावर घेतलेल्‍या जमिनीवर सैन्याच्या माध्यमातून पीक उत्‍पादनाला चालना देणे हा आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ओवैसींनी राहुल गांधींना नव्हे तर, पंतप्रधान मोदींना आव्हान द्यावं; संजय राऊतांचा घणाघात

पंजाब प्रांतातील शेती ताब्यात घेण्याची तयारी

लष्कर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात दहा लाखाहून अधिक एकर जमीन संपादित करणार आहे. तशा हालचालीसुद्धा सुरू झाल्या आहेत. हे क्षेत्र दिल्लीपेक्षा जवळपास तिप्पट आहे. पाकिस्तानी लष्कराच्या दाव्यानुसार, यामुळे पीक उत्पादन चांगले होईल आणि पाण्याची बचत होणार आहे. तर परकीय चलन साठा आणि वस्तूंच्या वाढत्या किमती यामुळे कमी होण्यास मदत होणार असल्याचेही म्हटल्या गेले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भर बैठकीत पंतप्रधान मोदी ‘साप’ कोणाला म्हणाले? माजी वित्त सचिवांच्या पुस्तकात खुलासा

30 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर…

गहू, कापूस आणि ऊस तसेच भाजीपाला आणि फळे पिकवण्यासाठी लष्कराला 30 वर्षांपर्यंत भाडेपट्ट्याने ही जमीन दिली जाणार असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. मात्र याचवेळी अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. लष्कर आधीच खूप शक्तिशाली आहे. अशा परिस्थितीत, अन्न सुरक्षा अभियानातून मोठा नफा मिळू शकतो आणि यामुळे पाकिस्तानच्या कोट्यवधी ग्रामीण भूमिहीन गरीबांचे नुकसान होईल. समीक्षकांनी म्हटले आहे की नवीन पाऊल पाकिस्तानचे सैन्य देशातील सर्वात मोठे जमीन मालक म्हणूनही उदयास येऊ शकतात.

सद्यस्थितीत जमिन पडीक

माजी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी चालवल्या जाणाऱ्या फौजी फाऊंडेशन गुंतवणूक गटाचे सदस्य असलेल्या फोंगारो यांनी याबाबतीतील आरोप फेटाळून लावले आहेत. फोंग्रोच्या व्यवस्थापकाने दिलेली बहुतांश जमीन नापीक असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याचा प्रश्नच येत नाही. वाळवंटातील जमीन कशी मशागत करावी, हा एकच उद्देश यामागे असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -