घरदेश-विदेशयंदाची निवडणूक सर्वात 'महाग', इतके कोटी होणार खर्च

यंदाची निवडणूक सर्वात ‘महाग’, इतके कोटी होणार खर्च

Subscribe

दिल्लीच्या 'सीएमएस'चे प्रमुख एन भास्कर राव यांच्या सांगण्यानुसार, यंदाच्या निवडणुकीतील जास्तीत जास्त खर्च हा सोशल मीडिया, प्रवास आणि जाहिरात यांवर खर्च होणार आहे. '

‘भारतातील निवडणुक ही जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरणार आहे’, असा अहवाल दिल्लीतील सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या (सीएमएस) सादर केला आहे. या अहवालानुसार, भारतातली यंदाच्या निवडणुक प्रक्रियेसाठी ७ अब्ज डॉलर अर्थात ५० हजार कोटी रुपये इतका खर्च होण्याची शक्यत आहे. याआधी अमेरिकेतील २०१६ सालच्या निवडणुकीवर ६.५ अब्ज डॉलर खर्च झाले होते. तर भारतातील २०१४ सालच्या निवडणुकांसाठी ५ अब्ज डॉलर इतका खर्च आला होता. यंदाच्या निवडणुकांतील खर्चासंदर्भात सेंटर फॉर मीडिया स्टडीजने जाहीर केलेल्या अहवालानुसार, प्रत्येक मतदारावर सुमारे ८ डॉलर खर्च होणार आहेत. निवडणुकीसाठी भारतातील ६० टक्के जनतेचे दिवसाचे उत्पन्न तीन डॉलर असून त्यातुलनेत निवडणुकीत प्रत्येक मतदारावर होणारा खर्च जास्त आहे.

सर्वाधिक खर्च सोशल मीडियावर

सीएमएसचे प्रमुख एन भास्कर राव यांच्या सांगण्यानुसार, निवडणुकीतील जास्तीत जास्त खर्च हा सोशल मीडिया, प्रवास आणि जाहिरात यांवर खर्च होणार आहे. त्यातही सर्वात जास्त खर्च हा सोशल मीडिया मार्केटिंगवर होणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. २०१४ मध्ये सोशल मीडियावर केलेला खर्च जवळपास २५० कोटी रुपये इकता होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत हा खर्च ५,००० कोटी जाण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मुलाखती, सरकारी आकडेवारी आणि अन्य माध्यमांमधून ही माहिती गोळा करण्यात आली आहे. याशिवाय उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्यासाठी हेलिकॉप्टर, बस आणि प्रवासाच्या अन्य माध्यमांवरील खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

तज्ज्ञांच्या मतानुसार…

कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक जेनिफर बसेल यांच्या सर्वेक्षणानुसार, भारतात केंद्रीय स्तरावरील ९० टक्के नेत्यांना मतदारांना रोख रक्कम देणे, मद्य पुरवणे किंवा व्यक्तिगत वापरासाठी भेटवस्तू देणे यासाठी दबाव जाणवतो. तसंच गृहपयोगी वस्तूंपासून ते बकरीपर्यंतच्या वस्तू मतदारांना भेट म्हणून द्याव्या लागतात. निवडणुकांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी मोफत बिर्याणी किंवा चिकन करी असलेले भोजन द्यावे लागते आणि त्याचा अफाट खर्च होतो, असंही त्यांच्या सर्वेक्षणात म्हटलं आहे. तर दुसरीकडे कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यपक सायमन शोशार्ड यांच्या मते, भारतात मतदार संघ वाढत असतानाच उमेदवारही वाढत आहेत. त्यामुळे खर्च हा सहाजिकच वाढणार आहे. दरम्यान, गुप्त मतदान असल्याने लाच स्वीकारल्यानंतरही मतदार त्याच उमेदवाराला मतदान करणार, याची खात्री नसते. त्यामुळे उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवरुन उमेदवार किती प्रभावशाली आहे हे मतदार ठरवतात, असे शोशार्ड यांचं म्हणणं आहे.


वाचा : अंबाबाईचे दर्शन घेऊन युतीच्या सभेला सुरुवात…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -