घरमुंबई५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ; अध्यादेश जारी

५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ; अध्यादेश जारी

Subscribe

मुंबई महापालिकेच्या हद्दीतील ५०० चौ. फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफ केल्याबाबतचा अध्यादेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ९ मार्च रोजी जारी केली आहे.

मुंबई महापालिकेच्या हद्दीतील ५०० चौ. फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफ केल्याबाबतचा अध्यादेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ९ मार्च रोजी जारी केली आहे. सध्या विधीमंडळाचे अधिवेशन नसल्याने नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीष म्हैसकर पाटणकर यांनी याबाबतचा प्रस्ताव सरकारच्या वतीने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना पाठवला होता. त्या प्रस्तावाचे गांभिर्य ओळखून तात्काळ याबाबतचा अध्यादेश राज्यपालांनी काढला आहे.

शिवसेनेच्या दोन मागण्या मान्य 

मागील ५ वर्षापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ५०० चौ. फुटापर्यंत घरांना मालमत्ता करात माफ करण्यात येईल असे २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत आश्वासन दिले होते. अखेर भाजपसोबत लोकसभेची युती जाहीर केल्यानंतर शिवसेनेच्या मागण्यांपैकी नाणार प्रकल्प रद्द आणि ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ या दोन्ही मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या असून याचा फायदा निवडणुकीत शिवसेनेसह भाजपलाही होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मुंबईकरांसाठी खुशखबर 

मुंबईकरांसाठी ही खुशखबर असून त्याची अंमलबजावणी ही तात्काळ सुरु होणार आहे. तब्बल१ कोटी ३० लाख लोकसंख्या असलेल्या मुंबई महापालिकेच्या हद्दीत या निर्णयाचा फायदा सुमारे ३० लाख घर मालकांना होणार आहे.

हेही वाचा –

यंदाची निवडणूक सर्वात ‘महाग’, इतके कोटी होणार खर्च

- Advertisement -

अंबाबाईचे दर्शन घेऊन युतीच्या सभेला सुरुवात; सहा विभागात घेणार मेळावे

पार्थ यांना अजून कष्ट करावे लागतील; भावाचा सल्ला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -