घरदेश-विदेशMODI IN KASHMIR : 'उद्या नरेंद्र मोदींच्या सभेला जाल तर...'; काश्मीरमधील लोकांना...

MODI IN KASHMIR : ‘उद्या नरेंद्र मोदींच्या सभेला जाल तर…’; काश्मीरमधील लोकांना येतायत धमकीचे फोन?

Subscribe

नवी दिल्ली : कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी प्रथमच काश्मीरचा दौरा करणार आहेत. नरेंद्र मोदी श्रीनगरमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे अनावरण करतील आणि एका जाहीर सभेला संबोधित करतील. याचदरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

नरेंद्र मोदींच्या रॅलीवर बहिष्कार घालण्यासाठी फोन

श्रीनगरमध्ये होणाऱ्या नरेंद्र मोदींच्या उद्याच्या जाहीर सभेपूर्वी काश्मीरमधील लोकांना धमकीचे फोन येत आहेत, यात स्थानिक लोकांना नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेला उपस्थित न राहण्याची धमकी देण्यात येत आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय काश्मीरमध्ये मोबाइल आणि लँडलाईनवर नरेंद्र मोदींच्या रॅलीवर बहिष्कार घालण्यासाठी कॉल करत असल्याचं सांगण्यात येत आहे. काश्मीरमधील लोकांना सध्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय नंबरवरून फोन येत आहेत. फोन उचलल्यानंतर लोकांना धमकावले जात आहे आणि पंतप्रधानांच्या रॅलीपासून दूर राहण्यास सांगितले जात आहे. याची माहिती मिळताच सुरक्षा दल आणि गुप्तचर यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Bird Flu : राज्यातली ‘या’ शहरात बर्ड फ्लू; 8500 कोंबड्या अन् 16 हजार अंडी नष्ट

केंद्रशासित प्रदेशातील कृषी-अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या प्रकल्पांचे उद्घाटन

पंतप्रधान मोदी श्रीनगरमधील बक्षी स्टेडियममध्ये जम्मू आणि काश्मीरचा विकास या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि केंद्रशासित प्रदेशातील कृषी-अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सुमारे ५००० कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन करतील. यामध्ये “स्वदेश दर्शन” आणि “प्रसाद” (तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि अध्यात्मिक, हेरिटेज प्रमोशन ड्राइव्ह) योजनांच्या अंतर्गत १४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पर्यटन क्षेत्राशी संबंधित देशव्यापी प्रकल्पांचा समावेश आहे, ज्यामध्ये एकात्मिक विकासासाठी प्रकल्प यांचाही समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा –Yugendra Pawar On Sharad Pawar : शरद पवार हीच बारामतीची ओळख – युगेंद्र पवार

केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार

चॅलेंज-बेस्ड डेस्टिनेशन डेव्हलपमेंट (CBDD) योजनेंतर्गत निवडलेल्या पर्यटन स्थळांची घोषणा करण्यासोबतच, पंतप्रधान “देखो अपना देश पीपल्स चॉइस टुरिस्ट डेस्टिनेशन पोल” आणि “चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा” मोहिमेचा शुभारंभ करतील. पंतप्रधान मोदी जम्मू आणि काश्मीरमधील सुमारे 1000 नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करतील आणि विविध केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -