घरमहाराष्ट्रनागपूरBird Flu : राज्यातली 'या' शहरात बर्ड फ्लू; 8500 कोंबड्या अन् 16...

Bird Flu : राज्यातली ‘या’ शहरात बर्ड फ्लू; 8500 कोंबड्या अन् 16 हजार अंडी नष्ट

Subscribe

नागपूर : जिल्ह्याला कोरोनाच्या संकटातून अद्याप दिलासा मिळालेला नाही, अशातच आता ‘बर्ड फ्लू’ने दार ठोठावले आहे. कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’ची म्हणजेच एवियन इन्फ्लुएंजाची लागण झाल्याचा अहवाल समोर आल्यानंतर आतापर्यंत 8500 कोंबड्या अन् 16 हजार अंडी नष्ट करण्यात आली आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या तत्परतेमुळे रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले आहे. (Bird Flu in Nagpur 8500 chickens and 16 thousand eggs destroyed)

हेही वाचा – Devendra Fadnavis : शिवसेना-राष्ट्रवादीला एक डिजिट जागा? फडणवीस म्हणतात…

- Advertisement -

राज्य सरकारच्या नागपूरमधील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामधील पोल्ट्री फार्ममध्ये गेल्या काही दिवसांपासून शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता. काही दिवसातच हा आकडा 2650 पर्यंत पोहचला. अचानक इतक्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू का होत आहे? हे तपासण्यासाठी पुणे आणि भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले होते. अहवाल समोर आल्यावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. युवराज केणे, जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालय नागपूरचे डॉ. उमेश हिरुळकर, डॉ. अविरुद्ध पाठक, डॉ. स्पटे, डॉ. भालेराव, डॉ. सिरसाट, डॉ. लीना पाटील, डॉ. अविरत सवाईमुल, डॉ. मंगेश काळे यांच्यासह विभागाचे अधिकारी तातडीने नेरी गावात पोहोचले. त्यांनी नियमानुसार संबंधित पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र तर दहा किलोमीटर पर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.

हेही वाचा – Raj Thackeray : ‘होऊ दे चर्चा’, निवडणुकीदरम्यान ‘या’ कारणासाठी राज ठाकरेंचं थेट मोदींना पत्र

- Advertisement -

‘बर्ड फ्लू’चा अहवाल समोर आल्यानंतर संबंधित पोल्ट्री फार्ममधील 8500 कोंबड्यांना मारण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. याशिवाय अंडी उबवणी केंद्र असल्याने 16 हजार पेक्षा जास्त अंडीही नष्ट करण्यात आली. याबाबत नागपूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडकील यांनी माहिती दिली. तर डॉ. केनी यांनी सांगितले की, बर्ड फ्लू इतरत्र पसरू नये म्हणून कोंबड्या आणि अंडी जमिनीत गडाली आहेत. याशिवाय पोल्ट्री फार्ममधील इतर पक्षीही बाधित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या पक्षांचा अहवाल समोर आल्यानंतर त्यांना आणि त्यांची अंडीही नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ‘बर्ड फ्लू’ला आळा घालण्यासाठी विभागाचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा परिस्थितीत सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. केनी यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -