घरदेश-विदेशTitanic : टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेली पाणबुडी बेपत्ता; तीन दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन

Titanic : टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेली पाणबुडी बेपत्ता; तीन दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन

Subscribe

Titanic : नवी दिल्ली : 1912 मध्ये पहिल्या प्रवासादरम्यान टायटॅनिक (Titanic) जहाज एका हिमखंडावर आदळल्यानंतर अटलांटिक महासागरात बुडाले. या अपघातात 1,500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. जहाजाचे अवशेष 1985 मध्ये अटलांटिक महासागराच्या तळाच्या खूप खोलवर सापडले होते. आज इतक्या वर्षानंतर टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन गेलेली टुरिस्ट पाणबुडी अललांटिक महासागरात बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. (Titanic  The submarine that went to see the wreckage of the Titanic goes missing Only enough oxygen for three days)

पर्यटकांना घेऊन गेलेल्या पाणबुडीशी रविवारपासून (18 जून) संपर्क तुटला आहे. महत्त्वाचे म्हणजे या पाणबुडीमध्ये फक्त 70 तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक आहे. या पाणबुडीमध्ये पायलट आणि चार पर्यटक आहेत. या पर्यटकामध्ये ब्रिटनचे अब्जाधीश हामिश हार्डिंग (Hamish Harding) यांचाही समावेश आहे. 58 वर्षीय हार्डिंग एक एक्सप्लोररदेखील आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावरुन आपल्या पर्यटनाबाबतची माहिती दिली होती. गेल्यावर्षी नामीबियातून भारतात चिते आणण्यात हार्डिंग यांचाही सहभाग होता. हार्डिंग चित्यांना घेऊन येणाऱ्या विमानाचे पायलट होते.

- Advertisement -

अटलांटिक महासागरात शोधमोहिम

पाणबुडी बेपत्ता झाल्याचे समजताच अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशाकडून शोधमोहिम राबवली जात आहे. परंतु शोधमोहिमेत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दोन्ही देशाच्या रेस्क्यू टीम पाणबुडीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पाणबुडीच्या शोधासाठी पाम्यात सोनार व्बॉय पाठवण्यात आले आहेत. त्याशिवाय इतर जहाजांचीही मदत घेतली जात आहे.

- Advertisement -

टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी दोन कोटींचा खर्च 

कॅनडाच्या न्यूफाऊंडलँडमध्ये उत्तर अटलांटिकच्या तळाशी टायटॅनिकचे अवशेष आहेत. ते पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असून सेंट जोन्सच्या न्यूफाउंडलँडपासून यात्रा सुरू होते. टायटॅनिकचे अवशेष 3800 मीटर खोलवर आहेत. याठिकाणी जाण्यासाठी सबमर्सिबल ही पाणबुडी एका वेळी पाच लोकांना वाहून नेऊ शकते आणि टायटॅनिकच्या अवशेषापर्यंत पूर्णपणे डुबकी मारण्यासाठी सुमारे आठ तास लागतात. त्यामुळे हे पर्यटन साधारण 8 दिवसांचे आहे आणि या पर्यटनाचे तिकीट तब्बल अडीच लाख डॉलर म्हणजे 2 कोटी रुपये इतके आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -