घरदेश-विदेशAjmer Train Accident : अजमेरमध्ये साबरमती एक्स्प्रेस-मालगाडीमध्ये जोरदार धडक

Ajmer Train Accident : अजमेरमध्ये साबरमती एक्स्प्रेस-मालगाडीमध्ये जोरदार धडक

Subscribe

अजमेर (राजस्थान) : सुदैवाने गेल्या काही महिन्यांपासून देशात कोणताही रेल्वे अपघात झालेला नाही. मात्र, आज सोमवारी (ता. 18 मार्च) मध्यरात्री राजस्थानच्या अजमेरमध्ये एक्सप्रेस आणि मालगाडीमध्ये धडक झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. अजमेरमधील मदार रेल्वे स्थानकाजवळ साबरमती-आग्रा कॅन्ट सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात ही धडक झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, साबरमती आग्रा कॅन्ट सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या इंजिनसह 4 डबे रुळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. अजमेरमधील मदार स्टेशनजवळ रात्री 1.10 वाचताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. (Train Accident: Heavy collision between Sabarmati Express-goods train in Ajmer)

हेही वाचा… Cvigil App : आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांची सहज तक्रार करता येणार, Cvigil App विषयी सविस्तर माहिती

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील अजमेर येथे सोमवारी मध्यरात्री साबरमती-आग्रा सुपरफास्टचे चार डबे रुळावरून घसरले. या अपघातात अनेक प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. अजमेरमधील मदार रेल्वे स्थानकावर मध्यरात्री 1.04 वाजता साबरमती-आग्रा कॅन्ट सुपरफास्ट एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोको पायलटने ट्रेन थांबवण्यासाठी आपत्कालीन ब्रेकही लावला, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. दोन गाड्या एकमेकांसमोर आल्या आणि हा अपघात झाला.

या अपघाताची माहिती मिळताच, मदत पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नसून काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी अजमेर स्थानकात नेण्यात आले, असल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस यांच्यासह अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासह बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तत्काळ रुळावरून घसरलेले डबे आणि इंजिन पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. या घटनेनंतरचा व्हिडीओही समोर आला असून, त्यामध्ये रुळावरून घसरलेल्या डब्यांची तपासणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या धडकेमुळे रेल्वेचे काही खांबही रेल्वेच्यावर पडले असून ते गॅस कटरच्या सहाय्याने कापले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

ट्रेन अजमेर रेल्वे स्थानकातून रात्री 12:55 वाजताच्या सुमारास निघाली आणि काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये बसलेल्या लोकांना जबर धक्का बसला आणि सीटवर झोपलेली मुले, महिला आणि वृद्ध लोक सीटवरून खाली पडले. अपघातानंतर रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केली, अशी माहिती साबरमती एक्स्प्रेसमधील प्रवाशांकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -