घरदेश-विदेशलोकसभेत तिसऱ्यांदा तिहेरी तलाक विधेयक सादर

लोकसभेत तिसऱ्यांदा तिहेरी तलाक विधेयक सादर

Subscribe

तिसऱ्यांदा लोकसभेत हे विधेयक सादर करण्यात आले असून केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक सादर केले.

मुस्लिमांमधील तिहेरी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारे तिहेरी तलायक विधेयक आज पुन्हा लोकसभेच्या पटलावर सादर करण्यात आले. परंतु, या विधेयकावरून काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेऊन विधेयकातील तरतुदींवर आक्षेप घेतला आहे. यामुळे तिहेरी तलाक मुद्द्यावरून विरोधकांनी लोकसभेत एकच गोंधळ घातला. तिसऱ्यांदा लोकसभेत हे विधेयक सादर करण्यात आले असून केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सभागृहात तिहेरी तलाक विधेयक मांडले आहे.

- Advertisement -

यावेळी, काँग्रेसचे खासदार शशी थरूर आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तिहेरी तलाक विधेयकाला विरोध केला. तिहेरी तलाक विधेयक हे घटनाविरोधी असल्याचा आरोप विरोधकांनी केली. यावेळी चर्चेदरम्यान गोंधळ देखील झाला. यावर चर्चा करताना एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैंसी यांनी मुस्लीम महिलांबद्दल प्रेम दाखवता. मग शबरीमालाला विरोध का? असा सवाल सरकारला केला. तसंच पतीला तुरूंगात टाकल्यानंतर पत्नीला पोटगी कोण देणार? असा सवाल देखील यावेळी ओवैंसी यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

सरकारच्या मागील कार्यकाळात तिहेरी तलाक विधेयकाचा मुद्दा समोर आला होता. मात्र, या विधेयकास राज्यसभेत कोणतेही मंजुरी मिळाली नसल्याने हे विधेयक लांबणीवर गेले. यावेळीही तिहेरी तलाक विधेयकाला काँग्रेस सोबत इतर विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला. या विधेयकातील बऱ्याच तरतुदी संविधानाच्या विरोधात असल्याने विरोधकांनी ही भूमिका घेतली.

दरम्यान, तिहेरी तलाकचा मुद्दा हा भाजपच्या जाहीरनाम्यात होता, त्यामुळे हे विधेयक परत आणले जाईल. काँग्रेसकडून विधेयकाच्या मसुद्याला विरोध करण्यात आला असून विधेयक मुस्लिम कुटुंबियांच्या विरोधात असल्याचे कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -