घरटेक-वेकट्विटरचं एडिट फिचर लॉन्च, जाणून घ्या कोणाला मिळणार सुविधा?

ट्विटरचं एडिट फिचर लॉन्च, जाणून घ्या कोणाला मिळणार सुविधा?

Subscribe

नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांपासून ट्विट वापरकर्त्यांकडून सातत्याने करण्यात येणारी मागणी एलॉन मस्क यांनी मान्य केली आहे. भारतीय वापरकर्त्यांना आता त्यांचं ट्वीट एडीट करता येणार आहे. मोजक्या वेरिफाईड वापरकर्त्यांनाच ही सुविधा वापरता येणार आहे. या सुविधेनुसार वापरकर्त्यांनी पोस्ट केल्यानंतर अर्ध्या तासात ते आपली पोल्ट एडीट करू शकतात. (Edit Option in Tweet)

हेही वाचा – एलन मस्क यांनी ट्विटरच्या धोरणात केला नवा बदल; कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश

- Advertisement -

पेटीएमचे संचालक विजय शर्मा यांनी सुरुवातीला ट्वीटरवरून ही माहिती दिली. त्यांनी ट्विटरवरून एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. रात्री १०.५२ वाजता त्यांनी हे ट्विट केलं. त्यांनी ट्विट एडीट बटणाचा पर्यायही सांगितला आहे. महत्त्वाचं म्हणजे, केवळ व्हेरिफाईड युजर्सनाच हे फिचर वापरता येणार आहे.

हेही वाचा – तुमच्या कम्प्युटरमधील Google Chrome होणार बंद; जाणून घ्या कारण

- Advertisement -

केवळ निवडक वापरकर्त्यांनाच एडिटचा पर्याय वापरता येणार आहे. यासाठी पोस्ट केल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच एडीटचा पर्याय उपलब्ध असेल. ट्विट एडिटचं नवीन फिचर सध्या आयफोन वापरकर्त्यांसाठी लॉन्च करण्यात आलं आहे. तसंच, भारतातही व्हेरिफाईड वापरकर्त्यांना एडिट फिचर वापरता येणार आहे. तसंच, एडिट केलेली वेळही दिसणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -