घरदेश-विदेशपुढील दोन वर्षात टोलनाक्यांपासून होणार मुक्तता - नितीन गडकरी

पुढील दोन वर्षात टोलनाक्यांपासून होणार मुक्तता – नितीन गडकरी

Subscribe

जीपीएस टेक्नॉलॉजिचा होणार वापर

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतुकीसंदर्भात मोठी घोषणा केली असून पुढील दोन वर्षात टोलनाक्यांपासून मुक्तता होईल असे जाहीर केले आहे. पुढील दोन वर्षात महामार्गांवर कोणताही टोलनाका नसेल. यामुळे वाहनांना पैसे भरण्यासाठी थांबण्याची किंवा वाहनाची गती कमी करण्याची गरज नाही, असे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. पण जर तुम्ही असा विचार करत असाल की टोल नाके हटवल्यानंतर टोल फी लागणार नाही, तर असे नाही आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर वारंवार थांबावे लागते, या त्रासातून मुक्त करण्यासाठी जीपीएस तंत्रज्ञानावर काम सुरु असून दोन वर्षांत टोल नाके जीपीएस तंत्रज्ञानावर काम करतील. जीपीएस तंत्रज्ञानाद्वारे टोल घेतला जाणार आहे.

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणार नाहीत. वाहनांसाठी टोलची रक्कम आपोआप कपात केली जाईल. यासाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर सुरू असून लवकरच तो लागू केला जाईल.

- Advertisement -

गुरुवारी अ‍ॅसोचॅम परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित टोलिंगचा वापर करण्याच्या प्रस्तावावर मंत्रालय काम करत आहे आणि आता भविष्यातील सर्व वाहनेही जीपीएस प्रणालीशी जोडली जातील. गडकरी म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात राष्ट्रीय महामार्गावरून टोल वसुली गेल्या वर्षीच्या २४,००० कोटी रुपयांच्या कर संकलनाच्या तुलनेत ३४ हजार कोटी रुपये होती. तसेच केंद्रीय मंत्र्यांनी मंत्रालयामार्फत चालवल्या जाणार्‍या इतर प्रकल्पांची माहितीही दिली.

या परिषदेत केंद्रीय मंत्री म्हणाले की, दिल्ली-मुंबई ग्रीन फील्ड एक्सप्रेस वेच्या १३०० किलोमीटर लांबीचे ५० टक्के काम पूर्ण झाले असून येत्या दोन वर्षांत हे कामही पूर्ण होईल. बेंगळुरू आणि चेन्नई दरम्यानचा एक्सप्रेस वे दोन वर्षात पूर्ण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर दिल्ली मेरठ एक्सप्रेस वे देखील लवकरच पूर्ण होईल, जेणेकरुन या शहरांमधील अंतर ४.४५ तासात पूर्ण होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, दिल्ली-अमृतसर-कटरा आणि अमृतसर-अजमेर यांना जोडणार्‍या प्रकल्पांचे कामही पुढच्या महिन्यात सुरू होईल.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -