घरदेश-विदेशसंघ परिवाराप्रमाणे समाजवादी ढोंगी नाहीत, ठाकरे गटाचा भाजपावर थेट निशाणा

संघ परिवाराप्रमाणे समाजवादी ढोंगी नाहीत, ठाकरे गटाचा भाजपावर थेट निशाणा

Subscribe

मुंबई : संघ परिवाराप्रमाणे समाजवादी ढोंगी किंवा दुटप्पी नाहीत. त्यांच्या कारवाया गुप्त नसतात. समाजवादी आणि शिवसेनेतील वाद उघड आहेत. पण, पंचवीस वर्षे मैत्रीचे नाटक करून पाठीत खंजीर खुपसण्याचे कृत्य समाजवाद्यांनी केले नाही. महाराष्ट्र व राष्ट्र जाती-धर्माच्या नावाने पेटवून फोडण्याचे कारस्थान त्यांनी रचलेले नाही. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात समाजवादी उघडपणे सहभागी होते व देश स्वतंत्र झाल्यावर समाजवाद्यांनी आपापल्या घरावर तिरंगे फडकवून स्वातंत्र्याचे स्वागत केले, असे ठाकरे गटाने भाजपाला सुनावले आहे.

हेही वाचा – मिलावटी ‘मिंध्यां’ना हिंदुत्वातील भेसळ दिसू नये याचे आश्चर्य…, ठाकरे गटाची चौफेर टीका

- Advertisement -

इंदिरा गांधी हुकूमशाही पद्धतीने वागत आहेत, त्यामुळे देशाच्या लोकशाहीस धोका आहे याची खात्री पटताच समाजवादी विचारांचे जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालीच समग्र क्रांतीचा, दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा झाला व सर्व समाजवादी मंडळी त्यात सहभागी झाली होती. म्हणूनच देशात परिवर्तन झाले, असे सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने म्हटले आहे.

गोवा मुक्तीसंग्रामात संघ कोठेच नव्हता, पण राममनोहर लोहिया, मधू दंडवते, मधू लिमये हे समाजवादी पोर्तुगीजांशी लढण्यात आघाडीवर होते. आणीबाणीविरोधात समाजवादी जॉर्ज फर्नांडिस यांनी तर सशस्त्र लढ्याची उभारणी केली व त्याचा फायदा भाजपाने घेतल्याचा दावा या अग्रलेखात करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – “नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून…” विधानसभा अध्यक्षांवर संजय राऊतांचा हल्लाबोल

शिवसेना व समाजवादी विचारांच्या मंडळींचे मनोमीलन झाल्याबद्दल मिंधे गटाच्या दाढीला आग लागली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना हे पटले नसते वगैरे मुक्ताफळे त्यांनी उधळली आहेत. शिवसेना व समाजवादी एकत्र आले हे भाजपास पटलेले दिसत नाही. म्हणून मुख्यमंत्री मिरच्या झोंबल्याप्रमाणे तडतडत आहेत, अशी टीका या अग्रलेखातून ठाकरे गटाने केली आहे.

समाजवादी हे धर्मनिरपेक्ष, तरीही वाजपेयींच्या सरकारात ते सामील झाले. समाजवादी सरकारात आल्याने भाजपाचे ‘हिंदुत्व’ मिलावटीराम झाले नव्हते काय? मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढच्या काळात विधिमंडळ ग्रंथालयाचा वापर करणे गरजेचे आहे. इतिहासाची पाने चाळली तर त्यांच्या अगाध ज्ञानाची त्यांनाच लाज वाटेल. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ हा त्यांचा प्रकार राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहे, असा हल्लाबोलही ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – खासदार शेवाळे VIP असल्याचा वकिलांचा दावा; दंडाधिकाऱ्यांनी सुनावले खडे बोल, म्हणाले, कोर्टापुढे सगळेच …

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवसांचेच पाहुणे आहेत, असा सर्वोच्च न्यायालयाचाच निवाडा आहे. त्यांचे मुख्यमंत्रीपद जसे बेकायदा आहे, तसे त्यांचे हिंदुत्वदेखील ढोंगी आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘ढोंगांतर’ करून जे हिंदुत्व स्वीकारले ते बेगडी आहे. शिंदे यांनी पक्षांतर केले व ढोंगांतरही केले. त्यातून निर्माण झालेला ‘माजवाद’ जनता कायमचा गाडेल, असा विश्वास या अग्रलेखात करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -