घरदेश-विदेशसावित्रीबाई फुलेंनी काँग्रेसच्या हातात मिळवला हात

सावित्रीबाई फुलेंनी काँग्रेसच्या हातात मिळवला हात

Subscribe

सावित्रीबाई फुलेंसोबत फतेहपूरचे माजी खासदार राकेश सचान यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

भाजपला रामराम ठोकलेल्यानंतर भाजपच्या बंडखोर खासदार सावित्रीबाई फुले यांनी काँग्रेसच्या हातात हात दिला आहे. सावित्रीबाई फुले या उत्तर प्रदेशच्या बहराई लोकसभा मतदार संघाच्या खासदार होत्या. त्यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सावित्रीबाई फुलेंसोबत फतेहपूरचे माजी खासदार राकेश सचान यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्या सिंधिया यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

- Advertisement -

भाजपला मोठा धक्का

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सावित्रीबाई फुले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे उत्तरप्रदेशमध्ये भाजपला दलित मतांचा मोठा आधार होता. आता त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भाजपला धक्का बसला आहे. सावित्रीबाई फुले यांनी डिसेंबर २०१८ मध्ये भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. भाजपला रामराम ठोकताना सावित्रीबाई फुले यांनी भाजपच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली होती. भाजप सोडण्यापूर्वी ते भाजपवर सातत्याने टीका करत होते.

भाजप सरकार दलित विरोधी

भाजप समाजामध्ये फूट पाडण्याचा कट रचत आहे. तसंच भाजप सरकार दलित विरोधी आहे. मी दलित खासदार असल्यामुळे माझे मताकडे दुर्लक्ष केले जायचे. मोदी सरकारचे धोरण हे दलितविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सावित्रीबाई फुले यांनी ज्यावेळी भाजपला रामराम ठोकला त्यावेळी त्या कोणत्या पक्षात जाणार हे जाहीर नव्हते केले. भाजपवर त्यांनी अनेक आरोप करुन रामराम ठोकला होता. यापुढे आयुष्यात कधीही भाजपासोबत जाणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले होते.

- Advertisement -

हेही वाचा – 

सावित्रीबाई फुलेंनी का सोडले भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -