घरमहाराष्ट्रनाणार प्रकल्पामुळे निसर्गाची हानी - उद्धव ठाकरे

नाणार प्रकल्पामुळे निसर्गाची हानी – उद्धव ठाकरे

Subscribe

नाणार प्रकल्पाला रद्द करण्याच्या अध्यादेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी स्वाक्षरी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी येथे जाऊन तेथील नागरिकांना हे अध्यादेश दिले आहेत.

कोकणातील नाणार प्रकल्प रद्द करण्याची घोषणा शनिवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी येथे जाऊन लोकांशी संवाद साधला. नाणार प्रकल्प रद्दझाल्याचे अध्यादेश उद्धव ठाकरे यांना लोकांना दिले. याचबरोबर कोकणाने कधीही हाक मारली तर मदतीला येण्याची तयारीही त्यांनी दाखवली. उद्धव ठाकरे यांच्या सोबत उद्योगमंत्री सुभाष देसाईही या वेळी उपस्थित होते. मात्र युतीतून झालेल्या नामुश्कीमुळे भाजपला हा निर्णय घेण्यास भाग पडला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे 

“नाणार प्रकल्पामुळे निसर्गाची हानी होत आहे. त्यामुळे हा प्रकल्प बंद करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कबुली दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी नाणार रद्दच्या अध्यादेशावर सही देखील केली आहे. शिवसेना ही विकासाबरोबर आहे. नाणार प्रकल्प रद्द झाल्यानंतर येथील जमीनी स्थानिकांना मिळतील. स्थानिकांनी त्यावर शेती करावी. कोकणाने कधीही मला आवाज द्यावा मी सदैव मदतीसाठी धावून येणार.” – उद्धव ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -