घरदेश-विदेशमुस्लीम भगिनी माझे कौतुक करत असल्याने काहींच्या पोटात दुखते

मुस्लीम भगिनी माझे कौतुक करत असल्याने काहींच्या पोटात दुखते

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांना टोला

मुस्लीम भगिनींना आम्ही तीन तलाक प्रथेच्या छळातून मुक्त केले. तीन तलाक कायदा बनवत त्यांना सुरक्षिततेचा विश्वास दिला. अशावेळी मुस्लीम भगिनी माझे कौतुक करू लागल्या की व्होटबँकेचे काही ठेकेदार अस्वस्थ होतात. त्यांच्या पोटात दुखू लागते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्होटबँकेचे राजकारण करणार्‍या पक्षांना टोला लगावला.

उत्तर प्रदेशात गुरुवारी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. याचवेळी पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे पहिली जाहीर प्रचारसभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम समाजाच्या हितासाठी केंद्राने घेतलेल्या निणर्यांचे दाखले दिले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तीन तलाक कायद्याचा उल्लेख करत मुस्लीम मतांचे राजकारण करणार्‍या पक्षांना सुनावले. मुस्लीम माता-भगिनी आणि लेकींना त्यांचे हक्क मिळू नयेत म्हणून अनेक मार्गांनी अडथळे आणले जात आहेत. मात्र, या प्रवृत्तीला आम्ही थारा दिलेला नाही. तिहेरी तलाकच्या प्रथेवर बंदी घालून भाजप सरकारने मुस्लीम महिलांना न्याय मिळवून दिला आहे.

- Advertisement -

भाजप सरकार प्रत्येक पीडित मुस्लीम महिलेच्या पाठीशी उभे असताना विरोधक त्यांची दिशाभूल करत आहेत. हे लोक मुस्लीम बहिणींना फसवत आहेत, जेणेकरून मुस्लीम मुलींचे आयुष्य नेहमीच मागे राहावे. उत्तर प्रदेशातील मुस्लीम भगिनींनाही माझे आवाहन आहे. तुम्हाला सुरक्षित वातावरण हवे असेल. जाचातून मुक्ती हवी असेल तर येथे योगी सरकार आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.

मुझफ्फरनगर आणि सहारनपूर येथील दंगलींचा उल्लेख करताना समाजवादी पक्षाला दंगलखोर अशी उपमा त्यांनी दिली. घराणेशाहीवर चालणारा हा पक्ष आज सत्तेत असता तर कोविडवरील लस रस्त्यावर विकली गेली असती. सपाच्या निवडणूक जाहीरनाम्यावरही मोदींनी निशाणा साधला. उत्तर प्रदेशच्या विकासासाठी, भयमुक्त वातावरणासाठी, दंगलमुक्त राज्यासाठी भाजप सरकार आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -