घरदेश-विदेशआंतरराष्ट्रीय प्रवासासाठी होम-क्वारंटाईनचे नियम हटवले

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी होम-क्वारंटाईनचे नियम हटवले

Subscribe

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या गाईडलाईन्स जारी

जगभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्स 14 फेब्रुवारीपर्यंत लागू असतील. या नव्या गाईडलाईन्सनुसार प्रवाशांना आता आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट वेबसाईटवर अपलोड करण्याव्यतिरिक्त लसीकरण प्रमाणपत्र अपलोड करणे गरजेचे असणार आहे. तसेच यात लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देखील गरजेचे असणार आहे. याशिवाय रेड लिस्टमध्ये नोंद केलेल्या देशांवरील निर्बंधही हटवण्यात आले आहेत. यात प्रवाशांना आता 7 दिवस होम क्वारंटाईन होण्याची आवश्यकता नसेल.

याचा अर्थ या देशांतून येणार्‍या प्रवाशांना आता कोरोनाचे रिपोर्ट येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही. सरकारने आता भारतात आल्यानंतर 14 दिवसांसाठी सेल्फ मॉनिटरिंगची शिफारस केली आहे. त्याचवेळी 7 दिवसांसाठीचे सक्तीचा होम क्वारंटाईन होण्याचा नियम काढून टाकला आहे. यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, निगेटिव्ह आरटीपीसीआर अहवाल वेबसाईटवर अपलोड करण्याव्यतिरिक्त आता जगभरातील देशांकडून देण्यात आलेल्या कोरोनाविरोधी लसीचे प्रमाणपत्र अपलोड करण्याचा पर्याय देखील असेल.

- Advertisement -

2 टक्के प्रवाशांची रँडम सॅम्पलिंग
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतात हवाईमार्गे आल्यानंतर सर्व देशांतील 2 टक्के आंतरराष्ट्रीय प्रवाशांची रँडम सॅम्पलिंग केली जाईल. यावेळी प्रवासी त्यांचे सँपल देऊन विमानतळावरून जाऊ शकतात. जगभरात कमी होणारी कोरोना रुग्णसंख्या घेऊन केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबत या नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. अनेक देशांमध्ये केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी लसीकरणाशिवाय प्रवेश दिला जात नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -