घरदेश-विदेशव्हॉट्सअॅपमुळे लग्नाआधीच मोडला संसार

व्हॉट्सअॅपमुळे लग्नाआधीच मोडला संसार

Subscribe

सतत व्हॉट्सअॅपवर ऑनलाईन राहणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. व्हॉट्सअॅपवर ऑनलाईन राहत असल्याने तरुणांने लग्नाच्याच काही तास आधी तरुणीशी लग्न न करण्याचा निर्णय घेतल्याने लग्नाआधीच व्हॉट्सअॅपमुळे संसार मोडल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडल्याचे समोर आले आहे.

आजकाल सोशल मीडियामुळे अनेकांना फायदा होतो. सोशल माडियाद्वारे जुने मित्रमैत्रीण एकत्र येतात. हरवलेला मित्र, भाऊ, बहिण, आई – वडिल भेटण्यासाठी सोशल मीडियाचा एक मोठा वाटा समजला जातो. ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात तशाच एखाद्या गोष्टीला देखील चांगली तर दुसरी वाईट बाजू असते. अशाच सोशल मीडियाला दोन बाजू आहेत. ज्याप्रमाणे सोशल मीडियाचे फायदे आहेत तितकेच तोटे देखील असल्याचा प्रत्यय उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळाला आहे. एका तरुणीचा व्हॉट्सअॅपच्या अतिवापरामुळे लग्नाआधीच संसार मोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

नेमके काय घडले?

उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यातील एक तरुणी सतत व्हॉट्सअॅपवर ऑनलाईन राहायची. लग्न जुळल्यापासून ती सतत नवऱ्या मुलाच्या कुटुंबियाना मेसेज पाठवत असल्याचा आरोप नवऱ्या मुलांनी केला आहे. कायम व्हॉट्सअॅपवर ऑनलाईन असल्यामुळे मला तिच्यासोबत लग्न करायचे नाही असे तरुणाने त्याच्या कुटुंबियांना लग्नाच्या दिवशी सांगितले. लग्नमंडपात लग्नाच्या विधी सुरु होण्याच्या काही तासांआधी नवरदेवाच्या कुटुंबियांने नवरीच्या कुटुंबियांना फोन करुन लग्न करण्यास मुलाचा नकार असल्याचे सांगितले.

- Advertisement -

६५ लाखांचा हुंडा

नवरदेव आणि त्याच्या मुलाच्या नातेवाईकांनी तब्बल ६५ लाखांचा हुंडा मागितल्याचा आरोप मुलीच्या वडीलांनी केला आहे. त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली असल्याचे नवरीच्या वडीलांनी सांगितले आहे. मात्र हा आरोप नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांनी फेटाळून लावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -