घरदेश-विदेशकॉल केल्यानंतर युझरचे नाव आणि नंबर नाही दिसणार; Truecaller बंद होणार? वाचा सविस्तर

कॉल केल्यानंतर युझरचे नाव आणि नंबर नाही दिसणार; Truecaller बंद होणार? वाचा सविस्तर

Subscribe

सरकारने गोपनीयता आणि डेटा चोरीसारख्या समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली : स्मार्टफोन्समध्ये नव-नवीन फीचर्स असतात. यातील एक फीचर म्हणजे कॉल केल्यानंतर कॉलरचे नाव आणि नंबर पाहता येतो. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नवीन दूरसंचार विधेयकानुसार युझरचे नाव आणि नंबर पाहता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

 

- Advertisement -

नवीन दूरसंचार विधेयकानुसार काही बदलण्यात आला आहे. यात विधेयक Calling Name Presentation (CNAP) यादीतून हा मुद्दा काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे कॉल करणाऱ्या युझरचे नंबरसोबत नाव दिसणार नाही. हे नियम सर्व कंपन्यांसाठी समान होते. सरकारने गोपनीयता आणि डेटा चोरीसारख्या समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा – Truck Driver Protest: ट्रक चालकांच्या संपामुळे राज्यात अभूतपूर्व परिस्थिती; सरकारने तोडगा काढावा, राऊतांचं विधान

- Advertisement -

डेटा चोरीसारख्या समस्या आळा घालण्यासाठी नियम

याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण गोपनीयता आणि डेटा उल्लंघनासंदर्भात नवीन नियमांवर सातत्याने काम केले जात आहे. या अंतर्गत हा नियम आणण्यात आला आहे. यामुळे डेटा चोरीसारख्या समस्या आळा घालण्यासाठी नियम आणले आहे. जर कंपन्यांनी युझरची नावे उघड केली तर युझरची गोपनीयतेचेही उल्लंघन होईल. आता नेटवर्क कंपन्या कोणत्याही युझरचे नाव दाखवू शकणार नाहीत.

हेही वाचा – Transport strike : असे राक्षसी कायदे करण्यात आले तर…, जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारवर निशाणा

Truecaller बंद होणार का?

सरकारचा हा निर्णय Truecaller सारख्या अॅपशी संबंधित नाही. तर सरकराच्या निर्णयामुळे Truecaller चा वापर वाढू शकतो. कारण यामुळे लोक आता इतर अॅप्स जास्त वापरायला लागतील. त्याच्या मदतीने युझरची माहितीही सहज मिळवता येते. तसेच, सध्या Truecaller वापरण्यासाठी कोणतेही पेमेंट करावे लागणार नाही. यामुळेच अनेकजण त्याचा वापर करतात. म्हणजे हा पूर्णपणे सरकारने घेतलेला निर्णय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -