घरदेश-विदेशuttarakhand election 2022 : उत्तराखंड निवडणुकीनंतरही हरीश रावतांची सक्रियता अन् घोषणांमागचा राजकीय...

uttarakhand election 2022 : उत्तराखंड निवडणुकीनंतरही हरीश रावतांची सक्रियता अन् घोषणांमागचा राजकीय अर्थ काय?

Subscribe

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले असले तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या नवीन घोषणांचा सिलसिला अद्याप सुरुचं आहे. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान होताच माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी काँग्रेस बहुमताने उत्तराखंडमध्ये सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावरही ते काँग्रेसच्यावतीने विविध घोषणा करत आहेत. यात हरीश रावत यांनी राज्यातील जनतेसाठी तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर या घोषणांची पूर्तता केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र हरीश रावत यांच्या रणनीतीचा हा एक भाग असल्याचे म्हटले जात आहे. नेमक्या घोषणा काय आहेत जाणून घेऊ….

उत्तराखंडमध्ये महिनाभराहून अधिक काळ प्रचारात गुंतलेले उमेदवार आणि दिग्गज आता मतदानानंतर निवडणुकीचा थकवा घालवत आहेत. तर अनेक नेते आपापल्या विजयाचे गुणगाण गात आहेत. तर काही राजकीय पक्ष आपापल्या समीकरणांनुसार जागांची समीकरणे करण्यात व्यस्त आहेत. मात्र काँग्रेसचा मोठा चेहरा आणि निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळणारे माजी मुख्यमंत्री हरीश रावत हे निवडणूक दौऱ्याप्रमाणेच सक्रिय दिसत आहेत. हरीश रावत सातत्याने लालकुवा परिसरात भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत. एवढेच नाही तर मतदानानंतरही हरीश रावत घोषणा करण्यातच व्यस्त आहेत. अशातच आता त्यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. सरकार स्थापन झाल्यास या घोषणांची पूर्तता केली जाईल, असे आश्वासनही दिले आहे. काँग्रेसचे सरकार आल्यास मंगलगीत गाणाऱ्या महिलांना दरमहा अठराशे रुपये पेन्शन दिली जाईल, अशी पहिला घोषणा हरीश रावत यांनी केली आहे. काँग्रेसचे सरकार आल्यावर मंगलगीत गाणाऱ्या महिलांना १८०० रुपये पेन्शन देण्याचे आश्वासन त्यांनी दिलेय.

- Advertisement -

हरीश रावत यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर लिहिले की, अनेक लोक त्यांना विचारत आहेत की, ते 10 मार्चपर्यंत त्यांचे दिवस कसे घालवणार आहेत. यावर ते सांगतात की, उत्तराखंड आणि तेथील लोकांसाठी काहीतरी करायचे आहे जे त्यांच्या जीवनासाठी किंवा राज्याच्या जीवनासाठी महत्त्वाचे आहेत. अशा लोकांपैकी एक म्हणजे आमच्या गावातील मंगलगीत गाणाऱ्या स्त्रिया. त्यापैकी बहुतांश स्त्रिया वृद्ध आहेत. ही परंपरा खंडित होऊ देऊ नका तसेच त्या महिलांना सन्मान मिळावा, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर लगेचच शगुन पेन्शन योजना सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शगुन अक्षर मांगलिक गीत गाणाऱ्या महिलांना ज्येष्ठांच्या बरोबरीने अठराशे रुपये पेन्शन म्हणून देण्यात येणार आहे. याशिवाय हरीश रावत यांनी घसियारी सन्मान पेन्शन योजना सुरू करणार असल्याची दुसरी घोषणा केली आहे. काँग्रेसचे सरकार आल्यावर या घोषणेनुसार गवत विकणाऱ्या महिलांना मासिक पाचशे रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. गवत विकणाऱ्या माता-भगिनींसाठी सन्मान पेन्शन योजना सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

एवढेच नाही तर हरीश रावत आजही पोलिसांना भेटून आपल्या आश्वासनांचा पुनरुच्चार करत आहेत. त्यांनी सांगितले की, पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी विशेष वचन दिले आहे. ते वचन त्याच्या ग्रेड पेशी संबंधीत आहे. सरकारमध्ये आल्यावर पोलीस कर्मचाऱ्यांच्या या मागण्या व इतर मागण्या प्राधान्याने सोडविणार असल्याची तिसरी घोषणा त्यांनी केली आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात पोलीस खात्यातील रिक्त पदे भरण्यास नेहमीच प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले. यावर ते म्हणाले की,  पोलीस भरतीच्या नोंदी आणि त्यांच्या पदोन्नतीच्या नोंदीवरूनही हे पाहिले आणि समजू शकते. कारण पोलिसांना प्रत्येक परिस्थितीत 24 तास काम करावे लागते. त्यामुळेच त्यांना स्पष्टपणे सांगायचे आहे की, इतर कर्मचारी संघटनांच्या मागण्यांप्रमाणे सर्वसाधारणपणे काँग्रेसची सत्ता आल्यावर पोलिस कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्राधान्याने सोडविल्या जातील.

हरीश रावत सोशल मीडियावरून तसेच प्रत्यक्षात मैदानात जाऊन आपली सक्रियता दाखवत आहेत. जाणकारांच्या मते हरीश रावत यांचे लक्ष्य मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गाठण्याचे आहे. याचा उल्लेखही त्यांनी एका मुलाखतीत केला होता. ज्यात त्यांनी मुख्यमंत्री होणार किंवा घरी बसणार असे स्पष्ट सांगितले. या विधानानंतर काँग्रेसला सत्ता मिळणार याची पूर्ण खात्री असल्याचे मानले जातेय. मात्र अशा स्थितीत काँग्रेसचे सरकार आल्यावर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हरीश रावत होणार की नाही, यावरून त्यांच्या समर्थकांकडून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू आहे.


नेटफ्लिक्स सीरिजनंतर कपिल शर्माचा आणखी एक धमाका! नंदिता दासच्या चित्रपटात घेतली एन्ट्री

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -