घरमनोरंजननेटफ्लिक्स सीरिजनंतर कपिल शर्माचा आणखी एक धमाका! नंदिता दासच्या चित्रपटात घेतली एन्ट्री

नेटफ्लिक्स सीरिजनंतर कपिल शर्माचा आणखी एक धमाका! नंदिता दासच्या चित्रपटात घेतली एन्ट्री

Subscribe

नेटफ्लिक्स शोनंतर आता कपिल शर्मा प्रेक्षकांसाठी आणखी एक धमाका घेऊन येणार आहे. या धमाक्यातून तो करिअरच्या आणखी एक महत्वाचा टप्पा गाठणार आहे. कारण कपिल शर्मा लवकरचं सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका नंदिता दास हिच्या आगामी चित्रपटात एन्ट्री घेणार आहे. या चित्रपटात कपिल मुख्य भूमिका साकारणार आहे. अॅप्लॉज एंटरटेनमेंट आणि नंदिता दास इनिशिएटिव्हजद्वारे चित्रपटाची निर्मिती होणार आहे.

या चित्रपटात कपिल एका फूड डिलिव्हरी रायडरची भूमिका साकारणार आहे. तर शहाना गोस्वामी त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस भुवनेश्वरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. या चित्रपटाबद्दल कपिल शर्मा म्हणतो की, “मी या प्रोजेक्टबद्दल खूप उत्सुक आहे, मी चित्रपट करत आहे म्हणून नाही, तर मी नंदिता दासचा चित्रपट करतोय म्हणून, मी त्यांना एक अभिनेत्री आणि दिग्दर्शक दोन्ही भूमिकेत पाहिले आहे. त्यांच्यांकडे कोणत्याही गोष्टींकडे पाहण्याचा खूप वेगळा दृष्टीकोण आहे. त्यामुळे एक अभिनेता म्हणून माझे काम फक्त ती सांगते तेच करणे आहे. तिचे काम माझ्यापेक्षा खूप वेगळे आहे आणि मला आनंद आहे की प्रेक्षकांना माझी एक नवीन बाजू पाहायला मिळेल.”

- Advertisement -

कपिल शर्मा आणि नंदिता यांची जुगलबंदी खरोखरच पाहण्यासारखी असेल, कारण दोघेही वेगवेगळ्या चित्रपटसृष्टीतील एक कलाकार आहेत. कपिलची ऑनस्क्रीन इमेज ही एक विनोदी कलाकार म्हणून आहे, तर नंदिताची फिल्मोग्राफी गंभीर आणि कंटेंट-केंद्रित चित्रपटांनी भरलेली आहे. नंदिताचा पहिला चित्रपट म्हणजे फिराक. त्यांचा 2018 चा मंटो हा चित्रपट सआदत हसन मंटो यांचा बायोपिक होता, ज्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत होता.


IT Raid : NSE च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या घरावर आयकर विभागाची धाड

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -