घरदेश-विदेशउत्तराखंडमध्ये मुंबईच्या यात्रेकरुंवर दरड कोसळली; ६ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये मुंबईच्या यात्रेकरुंवर दरड कोसळली; ६ जणांचा मृत्यू

Subscribe

उत्तराखंच्या चमोली येथील घाटात एका बसवर दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत सहा यात्रेकरुंचा जागीच मृत्यू झाला आहे.

उत्तराखंडच्या बद्रिनाथ येथून दर्शन घेऊन परतणाऱ्या मुंबईच्या यात्रेकरुंवर चमोली येथे दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत ५ यात्रेकरुंचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच ८ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

क्रेनमार्फत बचाव कार्य सुरु

चमोली येथील लामबगड भागात आज सकाळी दरड कोसळली. त्यामुळे रस्त्यावरील बसचा पुर्णपणे चुराडा झाला. याशिवाय बस चालकासह चार यात्रेकरुंचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. या बसमध्ये अकूण १३ जण होते. ८ नागरिक दगडांच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचे वर्तवण्यात आले आहे. या यात्रेकरुंना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात दगडांचा ढिगारा साचल्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. बसला ढिगाऱ्याखाली काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे.

- Advertisement -

उत्तराखंडमध्ये घाटात स्कूल व्हॅन कोसळली

उत्तराखंडमध्ये मंगळवारी आणखी एक दुखद घटना घडली. टिहरी गढवालची एक स्कूल व्हॅन घाटात कोसळली. कन्साली लमगाव जवळ ही दुर्घटना घडली. या व्हॅनमध्ये १८ विद्यार्थी होते. या दुर्घटनेत ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हॅनचालक गाडीवरील नियंत्रण गमवून बसल्यामूळे ही दुर्घटना झाल्याचे बोलले जात आहे.


हेही वाचा – ‘कॅब सोड नाहीतर तुझे कपडे फाडीन’; उबर चालकाची तरुणीला धमकी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -