घरताज्या घडामोडीविजय मल्ल्या लंडनमध्ये आला रस्त्यावर, कर्ज न फेडल्याने जप्त केला शानदार बंगला

विजय मल्ल्या लंडनमध्ये आला रस्त्यावर, कर्ज न फेडल्याने जप्त केला शानदार बंगला

Subscribe

विजय मल्ल्याचे जे घर जप्त करण्यात आले आहे, त्यामध्ये त्याची ९५ वर्षांची आई राहत होती.

हजारो कोटींचे कर्ज बुडवून भारतातून परदेशात पळालेला विजय मल्ल्या कर्जाच्या मोठ्या डोंगराखाली आहे. यामुळे आता विजय मल्ल्याच्या हातातून लंडनमधील शानदार घरसुद्धा गेले आहे. ब्रिटन कोर्टाने स्विस बँक यूबीएससोबत बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या कायदेशीर वादात विजय मल्ल्याचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्याला त्याचे शानदार घर खाली करण्याचे आदेश दिले आहेत. यावरच रोख लावण्याची मागणी मल्ल्याने केली होती. परंतु ब्रिटन कोर्टाने मल्ल्याचा हा अर्ज फेटाळून लावला आहे.

विजय मल्ल्याच्या अर्जावर लंडनमधील हायकोर्टच्या चॅन्सरी विभागाचे न्यायाधीश मॅथ्यू मार्श निकाला देताना म्हणाले की, ‘मल्ल्याच्या कुटुंबियांना कर्ज फेडण्यासाठी आणखीन वेळ दिला जाऊ शकत आहे.’ अशात आता मल्ल्याला हा शानदार बंगला सोडावा लागणार आहे. दरम्यान मल्ल्याने स्विस बँकेचे २.०४ कोटी पाउंडचे कर्ज फेडले आहे.

- Advertisement -

हे प्रकरण मल्ल्याची कंपन्यांपैकी एक रोझ कॅपिटल व्हेंचर्सद्वारे घेतलेल्या कर्जासंबंधित आहे. यामध्ये किंगफिशर एअरलाईन्सचे माजी प्रमुख, त्यांची आई ललिता आणि मुलगा सिद्धार्थ मल्ल्याला संपत्ती ताब्यात घेण्याच्या अधिकारसोबत सह-प्रतिवादी रुपात सूचीबद्ध केले होते.

माहितीनुसार, मल्ल्याचे जे घर जप्त करण्यात आले आहे, त्यामध्ये त्याची ९५ वर्षांची आई राहत होती. २०१६ साली मार्चमध्ये विजय मल्ल्या भारतातून पळून गेला होता. भारतात त्याच्यावर ९ कोटी रुपये कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. या प्रकरणांमध्ये मल्ल्या फरार आहे. अनेक बँकांनी ही कर्जे किंगफिशर एअरलाइन्सला दिली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Raima Islam: खून करुन पतीनेच पोत्यात कोंबला ‘या’ अभिनेत्रीचा मृतदेह, हरवल्याची तक्रारही दिली होती


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -