घरदेश-विदेशसावधान! दिल्लीवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता

सावधान! दिल्लीवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता

Subscribe

हे दहशतवादी पंजाबमधून दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

गुरुवारी (आज) गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद संघटनेचे सहा दहशतवादी दिल्लीत घातपात करण्याच्या तयारीत आहेत. हे दहशतवादी पंजाबमधून दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. यामुळे पंजाबमध्ये पोलिसांकडून हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सहा दहशतवाद्यांच्या टोळीने राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. ही माहिती मिळताच त्यासंदर्भात पोलीस महासंचालकांकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. ज्यामध्ये दहशतवाद्यांनी सीमारेषेवरील फिरोझपूर येथून पंजाबमध्ये प्रवेश केल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे फिरोझपूर परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. येथील सर्व यंत्रणांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हे दहशतवादी आगेकूच करत पुढे दिल्लीमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता गुप्तचर विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -


राजधानी दिल्लीमध्ये कडक सुरक्षा

दरम्यान पंजाब गुप्तचर विभागने दिलेल्या माहितीची गंभीरतेने दखल घेत, दिल्लीमध्ये सुरक्षा वाढवण्याचे निर्देश देण्यात आल्याचं समजतंय. गुप्तचर विभागाच्या म्हणण्याप्रमाणे त्या ६ दहशतवाद्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केली तर, त्यांना पकडण्यासाठी सर्व एंट्री पॉईंट्सवर तसंच चौक्यांवर कडक बंदोबस्त ठेवण्याच्या तसंच प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भारतीय लष्करालाही याविषयीची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता दिल्लीतील नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे.


वाचा: राजीनामा मागायचा अधिकार अमित शहांकडेच- मुनगंटीवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -