घरमनोरंजनमिका सिंगने उडवली राखी सावंतची टर

मिका सिंगने उडवली राखी सावंतची टर

Subscribe

राखी सावंतची गायक मिका सिंगनेदेखील टर उडवली आहे. राखी सावंत सध्या रेसलिंगमध्ये धमाल करत आहे अशा तऱ्हेने मिकाने राखीला पुन्हा टारगेट केलं आहे.

राखी सावंत रोज कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतेच. नुकतंच एका रेसलरने तिला आपल्या खांद्यावरून खाली फेकून दिल्यानंतर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. राखीला रेसलरशी घेतलेला पंगा चांगलाच महागात पडला असून ती सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. इतकंच नाही तर राखीनं यासाठीदेखील तनुश्री दत्ताला दोष दिला आहे. राखीच्या म्हणण्याप्रमाणे, ‘रीबेल या रेसलरने मुद्दाम माझं नुकसान केलं, तनुश्रीनेच रीबेलला मला मारण्यासाठी पैसे दिले त्यामुळेच रीबेलने मला पाडलं. मला नाच करता येऊ नये यासाठीच सगळं करण्यात आलं आहे. मी माझ्या चाहत्यांना सांगू इच्छिते की, त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी जेणेकरून मी या इंग्रजांशी लढू शकेन.’

या प्रकरणावर मिका सिंगने उडवली टर

या सर्व प्रकरणानंतर आता राखी सावंतची गायक मिका सिंगनेदेखील टर उडवली आहे. यापूर्वी २००६ मध्ये मिका सिंग आणि राखी सावंतचे चुंबन प्रकरण खूपच गाजले होते. त्यानंतर मिका प्रसिद्ध झाला असंही राखी बऱ्याचदा सांगते. यासंदर्भात मिकाने एक ट्विट केले आहे, ‘जब से पहना है मैंने इश्क सेहरा खलीबली हो गया है दिल. माझा बेटा एकदम मस्त खेळला. राखी सावंत सध्या रेसलिंगमध्ये धमाल करत आहे.’ अशा तऱ्हेने पुन्हा एकदा मिका सिंगने राखी सावंतची टर उडवली आहे. मात्र त्यावर अजूनही राखीने कोणतंही उत्तर दिलेलं नाही. पण आता यावर राखीचं काय उत्तर असेल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. कारण शांत बसणाऱ्या माणसांपैकी राखी नक्कीच नाही.

- Advertisement -

नक्की काय घडलं?

पंचकुलामधील ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये महिला रेसलर रीबेलने पंचकुलाच्या महिलांना तिच्याबरोबर दोन हात करण्याचं आव्हान दिलं होतं. त्यावर हे आव्हान राखी सावंतने स्वीकारलं. मात्र दोन हात करण्यापूर्वी रीबेलने नाचावं असं आव्हान राखीने दिलं. या आव्हानानुसार रीबेलने तर नाच केला. मात्र डान्स केल्यानंतर राखीला रीबेलने उचलून फेकून दिले. त्यामुळे राखीला मार बसला असून राखी सध्या हॉस्पिटलमध्ये आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -