घरदेश-विदेश'जनतेमुळे नाही तर काँग्रेसमुळे मुख्यमंत्री'- कुमारस्वामी

‘जनतेमुळे नाही तर काँग्रेसमुळे मुख्यमंत्री’- कुमारस्वामी

Subscribe

कर्नाटकातल्या ६ कोटी जनतेमुळे मी आज इकडे नाही, तर फक्त काँग्रेसमुळे या पदावर असल्याचे धक्कादायक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी नुकतेच प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. तसेच त्यांनी कर्नाटकच्या जनतेप्रती नाराजीही व्यक्त केली. एकीकडे भाजपकडून नव्याने स्थापन झालेल्या जेडीएस-काँग्रेसच्या आघाडी सरकारला टार्गेट करण्याची एकही संधी सोडली जात नसताना दुसरीकडे याच सरकारचे मुख्यमंत्री कुमारस्वामी काँग्रेसची तळी उचलण्याची संधी सोडत नाहीयेत.

‘काँग्रेसशिवाय निर्णय घेऊ शकत नाही’

- Advertisement -

कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर याचं आघाडी सरकार आहे. जनता दल सेक्युलर पक्षाचे कुमारस्वामी मुख्यमंत्री आहेत. पण ‘काँग्रेसशिवाय आमचे पानही हलत नाही’, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले आहे. ते म्हणाले की, ‘काँग्रेसवर आम्ही पूर्णत: अवलंबून असून त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही कोणताही निर्णय घेत नाही’. शिवाय ‘राज्य सरकारची जबाबदारी वेगळी असेल आणि मुख्यमंत्री म्हणून माझी राज्यातल्या जनतेप्रती जबाबदारी वेगळी असेल’, हे सांगायला देखील ते विसरले नाही.

कानडी जनतेविषयी नाराजी

- Advertisement -

काँग्रेससोबत सत्ता स्थापन केल्यामुळे जनता दल पक्ष काँग्रेसच्या ऋणात असल्याचे सांगत कुमारस्वामी यांनी काँग्रेसचे प्रसारमाध्यमांसमोर आभार मानले. मात्र याचवेळी जनतेला उद्देशून ते म्हणाले की, ‘हे माझं स्वतंत्र सरकार नाही. राज्यातील ६ कोटी जनतेनं आम्हाला हवा तसा प्रतिसाद दिला नाही, म्हणून काँग्रेससोबत आघाडी करण्याची वेळ आली’.

…आणि कुमारस्वामी झाले मुख्यमंत्री

कर्नाटकमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. पण ते बहुमत सिद्ध करु शकले नाही. सत्ता स्थापनेपासून भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरने एकत्र येत सत्ता स्थापन केली आणि जनता दल सेक्युलरच्या एच.डी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले. २३ मे रोजी कुमारस्वामी यांनी कर्नाटकचे २४वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -