घरदेश-विदेश'राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी योग्य'

‘राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी योग्य’

Subscribe

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार असल्याचे राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालूप्रसाद यादव याचे पुत्र तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. सीएनएन न्युज१८ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार असल्याचे राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालूप्रसाद यादव याचे पुत्र तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. सीएनएन न्युज१८ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ‘राहुल गांधी हे एका राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने पोटनिवडणुकांमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्यामुळे भाजपला विचार करण्याची वेळ आली आहे.’ अशी पुष्टी देखील तेजस्वी यादव यांनी जोडली आहे. ‘राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नसून मायावती, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, शरद पवार, चंद्रबाबू नायडू यांचे मत देखील महत्त्वाचे असल्याचे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. शिवाय विरोधीपक्ष भाजपविरोधात एकत्र येत आहेत यावर देखील तेजस्वी यादव यांनी समाधान व्यक्त केले आहे. मोदी यांना घाबरण्याचे कोणतेही कारण नसून पंतप्रधानपद हे कायमस्वरूपी नसल्याचा टोला देखील तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे. शिवाय तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदींची तुलना हुकूमशहा ‘हिटरल’शी केली. राहुल गांधी यांच्यासोबत ममता बॅनर्जी, मायावती, शरद पवार, चंद्रबाबू नायडू यांच्या पंतप्रधानपदाच्या नावाला देखील तेजस्वी यादव यांनी पसंती दर्शवली आहे.

‘मोदी देखील होते हतबल’

‘मोदींच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आले याचा अर्थ विरोधीपक्ष हतबल आहे असा होतो का? शिवाय मोदींनी ज्यावेळी निवडणुकीकरता ४० पक्षांची मोट बांधली याचा अर्थ मोदी हतबल होते असाच होतो का?’ अशा शब्दात तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे.

- Advertisement -

शत्रुघ्न सिन्हा यांचे स्वागत

भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा ‘राजद’मध्ये आल्यास त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे कायमस्वरूपी उघडे असल्याचे तेजस्वी यादव यांनी सांगितले. शत्रुघ्न सिन्हाना पाटणातून तिकीट द्यायला पक्षाची हरकत नसल्याचे देखील यादव यांनी सांगितले. शत्रुघ्न सिन्हा यांची लालू प्रसाद यादव यांच्याशी वाढती जवळीक पाहता तेजस्वी यादव यांच्या या विधानाला देखील महत्त्व आले आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर भाजप नेतृत्व नाराज आहे तसेच सिन्हा ‘राजद’मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. पंतप्रधान मोदींसह भाजपच्या कार्यशैलीवर शत्रुघ्न सिन्हा भाजप नाराज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -