घरदेश-विदेशग्रीन फटाके फोडा म्हणता, पण हे 'ग्रीन फटाके' आहेत काय?

ग्रीन फटाके फोडा म्हणता, पण हे ‘ग्रीन फटाके’ आहेत काय?

Subscribe

रस्सी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब यांसारख्या फटाक्यांमध्ये सल्फर डायऑक्साइड आणि नाइट्रस ऑक्साइडचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे अधिक प्रदूषण होते. या शिवाय सापाची गोळी, चटई बॉम्ब, फुलबाजा, चक्र, पाऊस यामध्येही या प्रदूषण करणारे घटक अधिक असतात.

अगदी काहीच दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. पण या दिवाळीत फटाके फोडायचे की नाही? या संभ्रमात असताना सुप्रीम कोर्टाने फटाके फोडण्याची परवानगी देऊन फटाके विक्रेत्यांना दिलासा दिला खरा… पण फटाके फोडण्याची नियमावली देखील दिली. या परवानगीत प्रदूषणाला आळा बसवण्यासाठी ‘ग्रीन’ फटाके फोडण्यास देखील सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले. पण आता एक वेगळाच प्रश्न सगळ्यांसमोर उपस्थित होऊ लागला आहे. तो म्हणजे हे ग्रीन फटाके आहेत तरी काय?

ग्रीन फटाके म्हणजे नेमकं काय?

दिवाळीच्या दिवसांत होणारे ध्वनी आणि वायूप्रदूषण पाहता सुप्रीम कोर्टाने कमी आवाज करणारे आणि कमीत कमी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांची विक्री करण्याचे सांगितले. ग्रीन फटाक्यांची संकल्पना सुप्रीम कोर्टाने दिली. पण हे ग्रीन फटाके म्हणजे नेमके काय? असा प्रश्न फटाके बनवणाऱ्यांना आणि विक्रेत्यांना देखील पडला. ग्रीन फटाके असे काही नसते, अशी प्रतिक्रिया अनेक फटाके बनवणाऱ्यांकडून आली. तर काहींनी पर्यावरणपूरक फटाके हे गेल्या काही वर्षांपासून बाजारात आहेत असे सांगितले. यात प्रामुख्याने कागदी शॉर्टस, स्नेक ट्युब, फॉग, रंगबेरंगी फुलबाजा असे काही फटाके आहेत. आता सुप्रीम कोर्टाने ग्रीन फटाके काय याची व्याख्या सांगावी, असा देखील सूर उमटत आहे.

- Advertisement -

फटाक्यांवर सरसकट बंदी नाही – सर्वोच्च न्यायालय

पण फटाके बनवणारे म्हणतात?

ग्रीन फटाक्यांबाबत संभ्रम असताना विक्रेते पर्यावरण फटाके म्हणजेच ग्रीन फटाके असं म्हणत आहेत. तर दुसरीकडे तामिळनाडूतील शिवकाशी येथील फटाके बनवणाऱ्या कंपन्यांनी मात्र ग्रीन फटाके असे काही नसते असे सांगत या संदर्भात पूनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कमी रसायनांचा वापर करुन फटाके बनवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण ग्रीन फटाके काय ते सुप्रीम कोर्टाने समजवून सांगावे, असे देखील उद्योजकांचे म्हणणे आहे.

हे फटाके हानीकारक

रस्सी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब यांसारख्या फटाक्यांमध्ये सल्फर डायऑक्साइड आणि नाइट्रस ऑक्साइडचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे अधिक प्रदूषण होते. या शिवाय सापाची गोळी, चटई बॉम्ब, फुलबाजा, चक्र, पाऊस यामध्येही या प्रदूषण करणारे घटक अधिक असतात.

- Advertisement -

मोगलाई आहे का? रात्री १० नंतर फटाके फोडणारच – भाजप खासदार

हे आहेत पर्यावरणपूरक फटाके

पर्यावरणपूरक फटाक्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रचलित कागदी शॉर्टस हा प्रकार आहे. हा एक फटाका ९ ते १० वेळा फुटतो आणि त्यातून कागदाचे कपटे बाहेर पडतात. या शिवाय रंगाचा धूर सोडणारा फॉग हा प्रकार देखील यात आहे.

फटाके फोडण्यापूर्वी कोर्टाच्या ‘या’ अटी, घ्या जाणून

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -