घरदेश-विदेशInflation : गृहिणींना मोठा दिलासा! डाळींच्या दरात प्रति क्लिंटल ८०० रुपयांची घसरण

Inflation : गृहिणींना मोठा दिलासा! डाळींच्या दरात प्रति क्लिंटल ८०० रुपयांची घसरण

Subscribe

कोरोना महामारीच्या काळात महागाईने त्रस्त गृहिणींनसाठी एक दिलासाजनक बातमी आहे. कारण गेल्या दोन महिन्यांत पहिल्यांदाच डाळींचे भाव घसरले आहेत. यात तूर, मूग, काळा हरभरा, काबुली चणे, राजमा यांच्या दरात प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपयांची घसरण झाली आहे. सतत वाढत्या महागाईत आत्ता भाजीपाल्यापाठोपाठ डाळींचे दर घसरल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या जेवणाची चव अधिक वाढणार यात शंका नाही.

असे आहेत डाळींचे दर

तूर डाळीच्या दरात सर्वाधिक म्हणजे ८०० रुपये प्रतिक्विंटलची घट झाली आहे. गुरुवारी शिमल्याच्या गंज बाजारपेठेत काळा हरभरा ६५००, मसूर ९१००, चण्याची डाळ ६६००, तूर ९१०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला, याता राजमाचे विविध प्रकारही बाजारात उपलब्ध आहेत. राजमाचा भाव १४६०० प्रतिक्विंटल तर उडीद ८८०० आणि मूग १०६०० प्रति क्विंटल झाले आहे.

- Advertisement -

यावर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी सांगितले की, खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्याने नक्कीच काहीसा दिलासा मिळाला आहे. तर किराणा दुकानदारांचे म्हणणे आहे की, भाजीपाल्याचे दर घसरल्याने डाळींचे दर गडगडले आहेत. भाज्यांचे दर घसरल्याने डाळींची मागणी घटली आहे. त्यामुळेच दरात घसरण झाली आहे.

डाळींचे दर ४०० ते ८०० पर्यंत घसरले

गंज बाजाराचे अध्यक्ष कमलेश गुप्ता म्हणाले की, डाळीचे दर सतत कमी होत आहे. तूर, दालचना, काळा हरभरा, मूग, तूर, मसूर यांचे दर क्विंटलमागे ४०० ते ८०० रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र मूग आणि उडद डाळीचे दर स्थिर आहेत.

- Advertisement -

प्रति क्विंटल डाळींचे दर

डाळीचे प्रकार       सप्टेंबर           डिसेंबर
मसर –              ९५००             ९१००
डाळ हरभरा –      ७२००             ६६००
काळे हरभरे –      ७०००             ६५००
मूग –                ९८००             ९३००
तूर –                १०२००            ९४००
काबूली चणे –      ७५००             ९६००
राजमा –            १५३००            ११५०० – १४६००
खाद्यतेल –          १९८ प्रति लिटर
साखर –            (४६- ४५ प्रति किलो)


CBSE Exam Controversy : इयत्ता १० वीच्या प्रश्न पत्रिकेत महिलांविरोधात परिच्छेद; महिला आयोगाने CBSE ला पाठवली नोटीस


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -