घरताज्या घडामोडीGood Friday 2022 : गुड फ्रायडेची परंपरा आणि या दिवसाचं महत्व काय?,...

Good Friday 2022 : गुड फ्रायडेची परंपरा आणि या दिवसाचं महत्व काय?, का साजरा केला जातो हा दिवस

Subscribe

गुड फ्रायडे हा दिवस ख्रिश्चन धर्मातील लोकांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचं ख्रिश्चन समाजात मोठं महत्त्व आहे. गुड फ्रायडे हा दिवस ईस्टरच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी असतो. या दिवसाला फक्त गुड फ्रायडे नाही तर ब्लॅक आणि ग्रेट फ्रायडे या नावाने देखील हा दिवस ओळखला जातो. १७ एप्रिल रोजी ईस्टर संडे असल्यामुळे दोन दिवसाआधी म्हणजेच आज गुड फ्रायडे हा दिवस आला आहे.

का साजरा केला जातो हा दिवस?

आजच्या दिवशी जगभरातील चर्चमध्ये धार्मिक प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात येतं. यंदा कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आल्यामुळे गुड फ्रायडे हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल. आजचा दिवस ख्रिस्ताच्या बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येतो. ख्रिश्चन धर्मानुसार, गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्तांना सुळावर चढवण्यात आले होते. या दिवसाची आठवण म्हणून ख्रिश्चन धर्मामध्ये गुड फ्रायडे हा दिवश शोक दिवस म्हणून साजरा केला जातो

- Advertisement -

ख्रिश्चन धर्मामध्ये या दिवशी कोणताही आनंददायी कार्यक्रम साजरा केला जात नाही. या दिवशी धर्मातील लोकं फक्त काळे कपडे घालून चर्चमध्ये जातात आणि येशूने केलेल्या बलिदानाबद्दल प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करतात. या दिवशी आपण केलेल्या गुन्ह्यांची माफी येशूकडे मागितली जाते. येशूच्या बलिदानाचा दिवस असल्यामुळे चर्चमध्ये कोणत्याही प्रकारचा घंटानाद केला जात नाही. रोमन समाजातील ख्रिश्चन लोकं यादिवशी कडक उपवास पकडतात.

रोम राजाच्या एका आदेशानंतर येशुला शुक्रवारच्या दिवशीच सुळावर लटकवण्यात आलं होतं. त्या काळात अंधविश्वास आणि खोट्या समजूती पसरवणाऱ्या धर्मगुरुंचा सुळसुळाट झाला होता. मात्र, अशा परिस्थितीत देखील येशूने समाजाला योग्य वळणावर आणण्याचा प्रयत्न केला. येशूचे कार्य हे अनेकांना पटत नव्हते. त्यामुळे त्यांनी येशूच्या विरोधात रोमच्या राजाला भडकावलं. या रागातून येशूला सुळावर लटकवण्याचा निर्णय रोमच्या राजाने घेतला होता.

- Advertisement -

इस्टर संडे म्हणजे काय?

गुड फ्रायडेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारला इस्टर संडे म्हटलं जातं. कारण या दिवशी येशू पुन्हा जीवंत झाला आणि त्यापुढे ४० दिवस लोकांमध्ये राहून त्याने संदेश दिला, असं सांगितलं जातं. येशूच्या पुन्हा जिवंत होण्याच्या दिवसाला इस्टर संडेच्या रुपात साजरे केले जाते.


हेही वाचा : JEE Advanced 2022: JEE Advanced परीक्षेची नवी तारीख जाहीर, या तारखेला होणार परीक्षा, जाणून घ्या


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -