घरसंपादकीयदिन विशेषब्रेल लिपीचे जनक शास्त्रज्ञ लुई ब्रेल

ब्रेल लिपीचे जनक शास्त्रज्ञ लुई ब्रेल

Subscribe

ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल हे फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक होते. त्यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहाय्याने वाचनाची पद्धत, लिपी विकसित केली. त्यांचा जन्म ४ जानेवारी १८०९ रोजी फ्रान्सच्या कुपव्रे गावात झाला. चालायला लागल्यापासूनच लुई आपल्या वडिलांसह त्यांच्या कार्यशाळेत जात असत आणि वडिलांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असत.

लुई ३ वर्षांचे असतानाच वडिलांच्या वर्कशॉपमध्ये खेळताना तीक्ष्ण हत्यार लागून त्यांच्या डोळ्यांना दुखापत झाली व त्यांना अंधत्व आले. लहानपणापासून लुई स्वावलंबी होते. स्पर्श आणि वासाच्या सहाय्याने लुई अनेक वस्तू सहज ओळखत आणि स्वतःची कामे स्वतःच करीत असत. अभ्यासात लुई हुशार होते. पाद्री पॅलुय यांनी अनेक प्रयत्न करून पॅरीस येथील अंध मुलांच्या शाळेत लुई यांना प्रवेश मिळवून दिला. इतिहास, भूगोल, गणित, फ्रेंच, ग्रीक, संगीत असे अनेक विषय लुई या शाळेत सहजपणे शिकले.

- Advertisement -

ते पॅरिस येथे असताना फ्रेंच लष्करातील अधिकारी कॅप्टन चार्ल्स बार्बर हे उठावदार टिंबे व रेघा यांच्या आधारे रणांगणावरील संदेशवहनासाठी ब्रेल यांनी तयार केलेल्या लेखनपद्धतीचे प्रशिक्षण सैनिकांना देण्यासाठी तेथे आले होते. त्यांच्या लेखनपद्धतीमध्ये शब्दांचा आवाज स्पेलिंगशिवाय ओळखला जात असे. ब्रेल यांनी स्वत: या लेखनपद्धतीचा विशेष अभ्यास केला व तिचेच परिष्करण करून त्यांनी स्वत:ची लिपी तयार केली.

तीच पुढे ब्रेल लिपी म्हणून विख्यात झाली. आधुनिक युगात ही लिपी अंधांना खूपच वरदान ठरली; कारण संगीत, गणित, संगणक कार्यक्रम इत्यादींमुळे वेगवेगळ्या चिन्हांच्या आधारे या लिपीचा वापर केला जातो. ब्रेल यांच्या या लिपी शोधामुळे अंधांना पुस्तकांचे मुद्रितविश्व खुले झाले, तसेच त्यांचे आयुष्यही प्रकाशमय झाले. अशा या महान शास्त्रज्ञाचे ६ जानेवारी १८५२ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -