घरसंपादकीयदिन विशेषश्रेष्ठ लेखक आर. के. नारायण

श्रेष्ठ लेखक आर. के. नारायण

Subscribe

रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी हे लेखक होते. त्यांचा जन्म १० ऑक्टोबर १९०६ रोजी तामिळनाडूतील चेन्नई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण चेन्नई येथील लुथेरिअन मिशन स्कूल, सी. आर. सी. हायस्कूल आणि द ख्रिस्तीयन कॉलेज हायस्कूल अशा विविध ठिकाणी झाले.

नारायण हे विद्यापीठ प्रवेश परीक्षेमध्ये अपयशी झाले व त्यांनी एक वर्ष घरीच वाचन आणि लिखाण केले. त्यानंतर त्यांनी १९२६ मध्ये विद्यापीठ प्रवेश परीक्षा पास केली व महाराजा कॉलेज ऑफ मैसूर जॉईन केले. नारायण यांना पदवी पूर्ण करण्यासाठी चार वर्षे लागली. यानंतर त्यांनी शाळा शिक्षकाची नोकरी केली. परंतु त्यांनी लगेचच ती नोकरी सोडली. लिखाणामधून त्यांना फारच कमी कमाई होत असे. नारायण यांनी ‘स्वामी आणि मित्र ’ ही कादंबरी लिहिली. परंतु काकांनी त्यांच्या लिखाणावर टीका केली आणि बर्याच प्रकाशकांनी छापण्यास नकार दिला. याबरोबरच नारायण यांनी ‘मालगुडी’ या पुस्तकाचे लिखाण चालू केले.

- Advertisement -

नारायण यांची दुसरी कादंबरी ‘द बॅचलर ऑफ आर्ट्स’ (१९३७) ही त्यांच्या महाविद्यालयीन अनुभवावर आधारित होती. १९३७ मध्ये नारायण यांच्या वडिलांचा मृत्यू झाला व नारायण यांची कमाई काहीच नसल्यामुळे त्यांना सक्तीने मैसूर सरकारकडून कमिशन घ्यावे लागले. नारायण यांनी सुरुवातीच्या ३ कादंबर्‍यांमध्ये काही सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकला. पहिल्या पुस्तकामध्ये नारायण यांनी विद्यार्थीदशेवर व त्यांना वर्गामध्ये होणार्‍या शिक्षेवर प्रकाश टाकला. हिंदू विवाहामध्ये लग्नपत्रिका जुळण्याच्या प्रथेवर दुसर्‍या पुस्तकामध्ये प्रकाश टाकला. अशा या श्रेष्ठ लेखकाचे १३ मे २००१ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -