घरमनोरंजनठाकरे, मोदी यांच्यानंतर बायोपिकच्या स्पर्धेत उतरलाय 'रागा'

ठाकरे, मोदी यांच्यानंतर बायोपिकच्या स्पर्धेत उतरलाय ‘रागा’

Subscribe

बॉलिवूडमध्ये सध्या राजकीय नेत्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहायला मिळत आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, बाळासाहेब ठाकरे, यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील बायोपिक येत असल्याचे समजले होते. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही चित्रपट येत आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या राजकीय नेत्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहायला मिळत आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिक नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील बायोपिक येत आहे. या स्पर्धेत आता आणखी एक राजकीय नेत्याची एंट्री झाली आहे. तो नेता म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी म्हणजेच ‘रागा’. “माय नेम इज रागा” या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून हा चित्रपट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर चित्रीत केला असल्याचे दिसून येत आहे.

टीझरमध्ये दाखवल्याप्रमाणे, चित्रपटाची सुरुवात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या दृश्यापासून होते आणि शेवट २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या तापलेल्या वातावरणात होतो. पत्रकार रुपेश पॉल यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. राहुल गांधी यांचं बालपण, अमेरिकेतील विद्यार्थी जीवन आणि राजकीय वादविवादांचं चित्रण यात करण्यात आलं आहे.

- Advertisement -

‘माझा कोणत्याही नेत्याशी काहीही संबंध नाही. या चित्रपटासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही. कारण, हा चित्रपट वास्तव परिस्थितीवर आधारित आहे. त्यात जे काही दाखवण्यात आलंय ते जगजाहीर आहे.’ असे रुपेश पॉल यांनी सांगितले. पुढे ते म्हणतात, ‘या चित्रपटात दिग्गज कलाकारांना घेण्याचा विचार होता. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून तो विचार टाळला. कुणाची प्रतिमा मलिन करणं हा माझ्या चित्रपटाचा हेतू नाही.

राहुल गांधी यांची व्यक्तीरेखा अश्विनी कुमारने साकारली आहे. तर, मोदींच्या भूमिकेत हिंमत कपाडिया आपल्याला दिसणार आहेत. तसेच माजी पंतप्रधान मनमोहम सिंग यांची भूमिका अनुपम खेरचा भाऊ राजू खेर निभावताना दिसणार आहे.
आता निवडणूकीच्या काळात अजून कोणत्या बायोपिक येतायत हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -