घरमनोरंजनसुशांतने ३ दिवसांपुर्वी वडिलांना केला अखेरचा फोन; 'या' विषयी व्यक्त केली होती...

सुशांतने ३ दिवसांपुर्वी वडिलांना केला अखेरचा फोन; ‘या’ विषयी व्यक्त केली होती चिंता

Subscribe

ववडील दूर राहत असल्याने सुशांतला नेहमी असायची त्यांची काळजी

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले. मात्र त्याच्या अशा जाण्याने सगळ्यांना विचलित करून टाकलं आहे. सुशांतच्या या बातमीनंतर त्याचे कुटुंब पूर्णपणे तुटले आहे. ही बातमी सुशांतच्या वडीलांना कळाल्यानंतर त्यांची तब्बेत खालावली आहे. सर्वात जास्त दु:ख त्यांना आपला मुलगा गेल्याचे आहे. मुलाच्या मृत्युची बातमी ऐकून ते बेशुद्धच पडले होते. वडील दूर राहत असल्याने सुशांतला नेहमी त्यांची काळजी वाटायची. ३ दिवसांआधी त्याने वडीलांना अखेरचा फोन करुन तब्बेतीची चौकशी केली होती. तसेच कोरोनाचे संकट सुरू असल्याने वडिलांना घराबाहेर पडू नका असा सल्लाही दिला होता.

माझ्या वडीलांची काळजी घ्या

सुशांतसिंग राजपूत यांचे वडील कृष्णा कुमार सिंह पाटणा येथे एकटेच राहण्यास होते. त्यांच्या घरात एक केअर टेकर देखील आहे. तिचे नाव लक्ष्मी असून वडीलांच्या केअर टेकरसोबत तो फोन वरून बोलला होता. माझ्या वडीलांना कोरोनापासून वाचवा. त्यांची काळजी घ्या, त्यांना घऱा बाहेर पाठवू नका, असे त्याने लक्ष्मी यांना सांगितले होते.

- Advertisement -

लक्ष्मीने सांगितले की, रविवारी सुशांतचे वडील दुपारच्या जेवणासाठी बसले असता त्यांना मुंबईहून फोन आला. हा फोन मुंबई पोलिसांचा होता. त्यांनी फोनवरून सुशांतने त्याच्या घरात आत्महत्या केल्याची माहिती दिली. सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकून ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्याच्या मदतीस मित्र व शेजार्‍यांनी धाऊन आले आणि त्यांना सावरले.

दररोज वडिलांशी फोनवरून बोलायचा

लक्ष्मी म्हणाली की, सुशांत तिला ‘दीदी’ म्हणून आवाज द्यायचा. तो दररोज वडिलांशी फोनवरून बोलायचा. दोन दिवसांपूर्वी माझ्याशी बाबू (सुशांत) बोलला होता. यावेळी तो म्हणाला होता की, कोरोनापासून तुम्ही काळजी घ्या, त्याने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, मी पटनाला येईन आणि वडीलांना फिरायला घेऊन जाईन, मात्र तो आता येऊ शकणार नाही.


विलेपार्ले स्मशानभूमीत संध्याकाळी ४ वाजता सुशांतवर होणार अंत्यसंस्कार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -