घरमनोरंजनफिल्मफेअर पुरस्कार २०१९ : आलिया भट्टच्या 'राझी'ने मिळवले सर्वाधिक पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार २०१९ : आलिया भट्टच्या ‘राझी’ने मिळवले सर्वाधिक पुरस्कार

Subscribe

आलिया भट्टच्या 'राझी' या चित्रपटाने मिळवले फिल्मफेअर पुरस्कार २०१९ सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार पटकावले.यावेळीच आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले.

चित्रपचसृष्टी तसेच टेलिव्हिजन जगतातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार २०१९ सोहळा नुकताच पार पडला. ६४ व्या फिल्मफेअर पुरस्काराने हिंदी चित्रपटाच्या विश्वात सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यंदा शहारूख खान, आमीर खान. सलमान खान आणि अक्षय कुमार यासारख्या अभिनेत्यांच्या कोणत्याच चित्रपटाला पुरस्कार मिळाला नाही तर, पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट कथा असलेल्या चित्रपटांची जास्त चर्चा होती.

- Advertisement -

‘राझी’ने मिळवले सर्वाधिक पुरस्कार

टाईम्स समुहाच्या फिल्म प्रोडक्शन हाऊसचा जंगली पिक्चर्सचा ‘राझी’ या चित्रपटास मॅचबॉक्स पिक्चर्सचा ‘अंधाधुन’ या चित्रपटाने जोरदार टक्कर दिली. परंतु, या दोन्ही चित्रपटांना समान पाच-पाच पुरस्कार फिल्मफेअर सोहळ्यात मिळाले. या सोहळ्यात अभिनेत्री आलिया भट्ट हिला (राझी) या चित्रपटाकरिता पुरस्कार देण्यात आला. तसेच, अभिनेता रणवीर कपूरलाही (संजू) म्हणून पुरस्कार मिळाला. यावेळी आलिया भट्टच्या ‘राझी’ या चित्रपटाने मिळवले फिल्मफेअर पुरस्कार २०१९ सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार पटकावले.

- Advertisement -

मुंबईमधील जिओ गार्डन येथे रंगलेला फिल्मफेअर पुरस्कार २०१९ सोहळ्यास अनेक दिग्गजांसह कलाकार मंडळींनी हजेरी लाऊन सोहळ्यास चार चॉंद लावले. या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘बधाई हो’, ‘राझी’, ‘अंधाधुन’, ‘संजू’, ‘राजी’, ‘पद्मावत’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. मात्र, आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेल्या ‘राजी’ चित्रपटाने बाजी मारली आहे.

फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट ( राजी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणबीर कपूर (संजू)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (लघुपट) – कीर्ति कुल्हारी (माया)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (लघुपट) – हुसेन दलाल (शेमलेस)
सर्वोत्कृ्ष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सीकरी यांना बधाई हो सिनेमासाठी
अभिनेता सहाय्यक अभिनेता- संजू या सिनेमासाठी विकी कौशल यांना तर बधाई हो साठी गजराव राव यांना
सर्वोत्कृष्ट फिल्म (पॉप्युलर)- राजी
सर्वोत्कृष्ट फिल्म(क्रिटीक)- अंधाधुन
सर्वोत्कृष्ट फिल्म (क्रिटीक) पुरुष- रणवीर सिंह यांना पद्मावत तर आयुष्यमान खुराना यांना अंधाधुन सिनेमासाठी
सर्वोत्कृष्ट फिल्म (क्रिटीक)महिला- बधाई हो सिनेमासाठी नीना गुप्ता यांना
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (डेब्यू) -स्त्री या सिनेमासाठी अमर कौशिक यांना
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – मेघना गुलजार यांना राजी या सिनेमासाठी
सर्वोत्कृष्ट संवाद- अक्षत घिल्डियाल यांना बधाई हो सिनेमासाठी
सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम – पद्मावत
सर्वोत्कृष्ट फिक्शन (लघुपट)- रोगन जोश (दिग्दर्शक – संजीव विज)
सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन (लघुपट)- द सॉसर सिटी (दिग्दर्शक- सचिन बाळासाहेब सूर्यवंशी)
पॉप्युलर चॉइस पुरस्कार (सर्वोत्कृष्ट लघुपट)- प्लस मायनस
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्रफी पुरस्कार- पंकज कुमार (तुंबाड )
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (महिला) – श्रेया घोषाल (घूमर)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष)- अरिजित सिंग (राजी सिनेमातील ‘ऐ वतन’ गाण्यासाठी)
सर्वोत्कृष्ट वीएफएक्स- झिरो
सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड स्कोअर फिल्मफेअर पुरस्कार – डेनियल बी (अंधाधुन)
सर्वोत्कृष्ट अॅक्शन पुरस्कार- मुक्केबाज सिनेमातील विक्रम दाहिया आणि सुनील रोड्रिग्ज
सर्वोत्कष्ट प्रॉडक्शन डिझाइन पुरस्कार- नितिन जिहानी (तुंबाड)
सर्वोत्कृष्ट एडिटिंग पुरस्कार- पूजा लाढा सूरति (अंधाधुन)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार- शितल शर्मा (मंटो)
सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइन पुरस्कार- कुणाल शर्मा (तुंबाड)
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी पुरस्कार- कृतिका महेश (पद्मावत, घूमर)
सर्वोत्कृष्ट गीत- गुलजार (राजी सिनेमातील ‘अे वतन’साठी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (डेब्यू)- सारा अली खान (केदारनाथ)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (डेब्यू)- ईशान खट्टर (बियॉण्ड द क्लाउड )
सर्वोत्कृष्ट कथा- मुल्क (अनुभव सिन्हा)
सर्वोत्कृष्ट पटकथा – श्रीराम राघवन आणि टीम यांना अंधाधुन सिनेमासाठी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -