घरमनोरंजनकिंग खानची मुलगी सुहाना खान घेतेय बेली डान्सचे प्रशिक्षण; फोटो व्हायरल

किंग खानची मुलगी सुहाना खान घेतेय बेली डान्सचे प्रशिक्षण; फोटो व्हायरल

Subscribe

सध्या डान्सचे प्रशिक्षण घेतेय सुहाना खान

बॉलिवूडचे किंग खान अर्थात शाहारूख खानची मुलगी सुहाना खान नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेचा विषय ठरते. मग ते तिचे फोटो असो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. नुकताच सोशल मीडिय़ा सुहानाचे काही फोटो आणि व्हिडिओवरून लक्षात येते की, ती डान्सची मोठी चाहती आहे. विशेष म्हणजे सध्या ती डान्सचे क्लासेस देखील घेत आहे. याबद्दलची माहिती स्वतः सुहानाची ट्रेनर संजना मुथरेजाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत सुहानाचे कौतुक केले आहे.

- Advertisement -

बेली डान्सर म्हणून ओळखली जाणारी संजना मुथरेजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्वतःचा आणि सुहानाचा फोटो शेअर करत असे लिहिले की, ‘सुहाना उत्तमरित्या डान्स करतेच परंतु सुहाना चांगल्याप्रकारे डान्सचे प्रशिक्षण देखील घेते.’

- Advertisement -

सुहानाने आपले शिक्षण पुर्ण केले असून सुहाना मुंबईमध्ये परत आली आहे. अशातच सुहाना लवकरच बॉलिवूड विश्वात पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना देखील उधाण आले आहे. यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोवरून असे दिसतेय की, सुहाना एका बिग ब्रेकच्या तयारीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -