घरमनोरंजनअरेच्चा! 'या' गोष्टीत भुमी पेडणेकरने बीग बींनाही टाकले मागे!

अरेच्चा! ‘या’ गोष्टीत भुमी पेडणेकरने बीग बींनाही टाकले मागे!

Subscribe

आपली फिल्म ‘हाऊसफुल-४’च्यामूळे बॉलीवुड सुपरस्टार अक्षय कुमार स्कोर ट्रेंड्स इंडिया लोकप्रियता चार्टवर सर्वोच्च स्थानावर आहे. तर ‘सांड की आंख’ चित्रपटामूळे प्रतिभावान अभिनेत्री भूमि पेडणेकर अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

‘मिशन मंगल’ आणि ‘हाउसफुल-४’च्या यशानंतर खिलाडी कुमार सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ८८ गुणांसह पहिल्या क्रमांकावर असलेल्या अक्षय कुमारने लोकप्रियतेत किंग खानला मागे टाकलंय. ६९ गुणांसह शाहरूख खान दूस-या स्थानावर आहे. शाहरुखच्या टेड टॉक शो आणि नुकत्याच साज-या झालेल्या वाढदिवसामूळे डिजीटल, सोशल आणि प्रिंट पब्लिकेशन्समध्ये शाहरूखची लोकप्रियता वाढलेली दिसून आलीय.

- Advertisement -

‘सांड की आंख’ चित्रपटातल्या परफॉर्मन्समूळे भूमि पेडणेकर बॉलीवूड अभिनेत्रींच्या यादीत लोकप्रियतेत सर्वोच्च पदावर आहे. ५३ गुणांसह नंबर वन स्थानावर असलेल्या भूमीची सहकलाकार आणि या चित्रपटातली दूसरी ‘शूटर दादी’ म्हणजेच अभिनेत्री तापसी पन्नू ४७ गुणांसह दूस-या स्थानावर आहे.

बॉलीवुडचे बादशाह अमिताभ बच्चन आपल्या लोकप्रिय गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) च्यामूळे तिस-या क्रमांकावर आहेत. सुपरस्टार सलमान खान मात्र आश्चर्यकारकपणे सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. आपल्या आगामी दबंग ३ आणि राधे या सिनेमांच्या घोषणेनंतर सलमान खान चौथ्या स्थानावर आहे.

- Advertisement -

लोकप्रिय अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये अनुष्का शर्मा तिस-या स्थानावर तर प्रियंका चोप्रा चौथ्या स्थानावर आहे. अनुष्काचे तिचा पती क्रिकेटर विराट कोहलीसोबतचे फोटो तर प्रियंकाचे तिचा पती निक जोनाससोबतचे फोटो सध्या सोशल मिडीया व्हायरल होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -