घरमुंबईशिवसेनेची भूमिका पूर्णत: चुकीची - सदाभाऊ खोत

शिवसेनेची भूमिका पूर्णत: चुकीची – सदाभाऊ खोत

Subscribe

भाजप - शिवसेनेची युती तुडली हे योग्य झाले नाही, शिवसेनेची भूमिका पूर्णत: चुकीची आहे, अशी प्रतिक्रिया कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

‘शिवसेनेने घेतलेली भूमिका पूर्णत: चुकीची आहे. विधानसभेसाठी इतर मित्रपक्षांसाठी सोडलेल्या जागा वगळता उरलेल्या जागा ५०-५० टक्के वाटून घेण्याचा निर्णय ठरल्याचे बोले जात आहे. मात्र, ५० – ५० टक्के सत्ता वाटून काही अर्थ नाही. ज्या पक्षाच्या जागा जास्त त्या पक्षाने सत्ता स्थापन करावी. तसेच ज्या पक्षाच्या जास्त जागा असतात ते आपली सत्ता स्थापन करु शकतात. जनतेने आपले काम प्रामाणिकपणे केले आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापन करणे हे पक्षाचे काम आहे. मात्र, भाजप – शिवसेनेची युती तुडली हे योग्य झाले नाही’, अशी प्रतिक्रिया कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपकडून शिवसेनेला केंद्रीय मंत्रीमंडळात फक्त एकच मंत्रीपद मिळाले होते. त्यामुळे शिवसेना नाराज झाली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने शिवसेनेला राज्यातील मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप शिवसेनेसाठी मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील मतभेद टोकाला गेली आहेत. भाजपने सत्ता स्थापनेतून माघार घेतल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रण पाठवले आहे. मात्र, त्यासाठी फक्त २४ तासांचा कालावधी देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अत्यंत जलद गतीने घडामोडी घडत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ‘संज्या राऊतला शिवसैनिकच चोपेल’ – निलेश राणे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -