घरमनोरंजनमेहंदी सजली; अभिनेत्री सई लोकूरची लगीनघाई!

मेहंदी सजली; अभिनेत्री सई लोकूरची लगीनघाई!

Subscribe

अभिनेत्री सई लोकूर लवकरच बोहल्यावर चढणार आहे. काही दिवसांपूर्वी सईने सोशल मीडियावर तिच्या होणाऱ्या लाईफ पार्टनरबाबत खुलासा केला होता. अद्याप त्याची ओखळ तिने करू दिली नसली तरी लग्नाच्या तयारीचे फोटो सईने चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. नुकतेच तिने हाताला मेहंदी लावलेले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यामुळे लवकरच सईच्या डोक्यावर अक्षता पडणार, हे नक्की झाले आहे.

View this post on Instagram

And here he comes ❤️ . #mydimpledguy

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

- Advertisement -

सई लोकूर हिचे अरेंज मॅरेज असल्याने चाहत्यांना देखील याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे की, सईचा होणारा नवरा नेमका आहे तरी कोण आणि तो काय करतो? सध्या मात्र या सर्व बाबी तिने गुप्त ठेवल्या आहेत. सईने आपल्या मेहेंदीचा फोटो शेअर करत, मुझे अपनी प्रीत विच रंग दे…, असे कॅप्शन दिले आहे. सई लोकूर ही मूळची बेळगावची काही मोजक्याच मराठी हिंदी चित्रपटात तिने कामही केले आहे. ‘कूछ तुम कहो कूछ हम कहें’ हा तिने साकारलेला पहिला हिंदी चित्रपट त्यानंतर कपिल शर्मा सोबत ‘किस किसको प्यार करूं’ या हिंदी चित्रपटातही ती झळकली. मात्र मराठी बिग बॉसच्या शोमधून तिला चांगली प्रसिद्धी मिळाली होती.

हेही वाचा –

अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी विद्यापीठाकडून निरीक्षण समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -