घरमनोरंजनबॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला अटक?

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला अटक?

Subscribe

गेल्या महिन्यात बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केल्याचे वृत्त समोर आले होते. एका शोचे पैसे घेऊन त्या शोला उपस्थित न राहल्यामुळे तिच्यावर आरोप करण्यात आला होता. मात्र टि्वटच्या माध्यमातून तिने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. पण आता तिचा अटक केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये तिला बेड्या घालत असून सोनाक्षी त्याला विरोध करताना दिसत आहे. तसेच दुसऱ्या व्हिडिओत ती कॅमेऱ्यांपासून लपताना बाहेर पडत असल्याचं दिसत आहे. या दोन्ही व्हिडिओमुळे नक्की सोनाक्षीला अटक झाली आहे का नाही हा प्रश्न उपस्थित राहत आहे.

- Advertisement -

सध्या सोनाक्षी ही आगामी चित्रपट ‘मिशन मंगल’च्या प्रशोनमध्ये व्यस्त आहे. मात्र प्रदर्शना आधीच सोनाक्षी अडचणीत सापडली आहे. #AsliSonaArrested हा हॅटटॅग ट्विटरवर जोरदार ट्रेण्ड होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -