घरमुंबईनायर हॉस्पिटलकडून फिरत्या दंत दवाखान्याची सुविधा!

नायर हॉस्पिटलकडून फिरत्या दंत दवाखान्याची सुविधा!

Subscribe

नायर रुग्णालयातर्फे नव्या फिरत्या दंत रुग्णालयाचं महापौरांच्या हस्ते उद्घाटन झालं.

मुंबई महापालिकेच्या नायर दंत हॉस्पिटलचं आधुनिकीकरण करण्यात आलं असून मंगळवारी नव्या ७ प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे नायर दंत हॉस्पिटलकडून दातांच्या आरोग्याची काळजी आणि जनजागृती करण्यासाठी फिरत्या दवाखान्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. तब्बल ८ वर्ष प्रयत्न केल्यानंतर तंत्रज्ञानाने अद्ययावत असलेली एअर कंडिशनिंग फिरती व्हॅन तयार करण्यात आली आहे. या व्हॅनसाठी ५६ लाख एवढा खर्च करण्यात आला आहे. या व्हॅनद्वारे गल्लोगल्ली जाऊन दात तपासले जाणार आहेत. सुसज्ज असलेल्या या व्हॅनमध्ये उपचार करण्यासाठी ८ निवासी डॉक्टर उपलब्ध असणार आहेत. जे रुग्ण हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत नाहीत जसे की, ज्येष्ठ वृद्ध आणि दिव्यांगांसाठी ही व्हॅन फायदेशीर ठरेल. तात्काळ एक्स रे काढण्यासाठी पोर्टेबल एक्स-रे मशीनही व्हॅनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसंच, लोकांच्या जनजागृतीसाठी एक एलईडी व्हॅनमध्ये बसवण्यात आली आहे.

Nair Hospital Dental Van inauguration

- Advertisement -

तंबाखू खाणाऱ्यांचं होणार समुपदेशन

नायर दंत हॉस्पिटलमध्ये सर्वात जास्त तंबाखूमुळे होणाऱ्या समस्येसाठी रुग्ण दाखल होतात. त्यासाठी तंबाखू प्रतिबंध कक्ष सुरू करण्यात आला आहे. तोंडाच्या कॅन्सरसाठी कारणीभूत ठरणारे तंबाखूजन्य पदार्थ सोडवण्यासाठी या कक्षांतर्गत प्रयत्न केले जाणार असून रुग्णांचं समुपदेशनही केलं जाईल, असं नायर दंत हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंद्रेड यांनी सांगितलं आहे.

या प्रकल्पांचं उद्घाटन

फिरती दंत आरोग्य सेवा (डेंटल व्हॅन), २४ तास अत्यावश्यक दंत चिकित्सालय, नुतनीकरण झालेला आंतररुग्ण विभाग (पुरुष आणि महिला), सामाजिक दंतशास्त्र विभाग आणि संग्रहालय, तंबाखू प्रतिबंध कक्ष, नायर हॉस्पिटलच्या दंत महाविद्यालयाच्या संकेतस्थळाचे अनावरण, दंतशास्त्र माहिती पुस्तिका अशा एकूण ७ प्रकल्पांचं उद्घाटन मंगळवारी मुंबईचे महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आलं. नायर दंत हॉस्पिटलमध्ये दरवर्षी साडे तीन ते चार लाख रुग्णांवर उपचार केले जातात. ज्यात दातांच्या आरोग्याबाबत असलेल्या समस्यांच्या रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे, जर तोंडाचं आरोग्य चांगलं असेल, तर शरीराचं आरोग्य सुदृढ राहतं. त्यामुळे, प्रत्येकाने तोंडाची निगा राखणं महत्त्वाचं असल्याचं डॉ. आंद्रेड यांनी सांगितलं.

मुंबईकरांचं आरोग्य चांगलं रहावं यासाठी महापालिका काम करतेय. प्रत्येकाने दातांची काळजी घेतली पाहिजे. कारण, त्याच्यावर शरीराचं आरोग्य अवलंबून असतं. फिरती दंत सेवा सुरू केली आहे. त्याचा नक्कीच फायदा होईल. २४ तास काम करुनही डॉक्टर्स टीकेचे धनी होतात. तरीही डॉक्टरांनी नेहमी हसत काम करावं म्हणजे रुग्णांना बरं वाटेल.

प्रा. विश्वनाथ महाडेश्वर, महापौर, मुंबई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -