घरमनोरंजनअदा शर्माची ही अवस्था पाहून तुम्हीची थक्क व्हाल

अदा शर्माची ही अवस्था पाहून तुम्हीची थक्क व्हाल

Subscribe

अदा शर्मा सध्या वेगळ्याच अवतारात दिसत आहे. तिचा भाजी विकतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये तिची दयनीय अवस्था स्पष्ट दिसून येत आहे.

‘१९२०’ आणि ‘हसी तो फसी’ सारख्या हिंदी चित्रपटांतून आपल्या ग्लॅमरस लुकने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री अदा शर्मा सध्या वेगळ्याच अवतारात दिसत आहे. तिचा भाजी विकतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये तिची दयनीय अवस्था स्पष्ट दिसून येत आहे. चेहऱ्यावर उदासिनता, कळकट मळकट कपडे, दुःखाची झालर पाहायला मिळत आहे. ही अवस्था तिची खऱ्या आयुष्यात झाली नसून हा अवतार तिने एका चित्रपटासाठी केल्याचे समोर येत आहे.

तिचा हा फोटो इंटाग्रामवर पोस्ट झाला आहे.

- Advertisement -

हॉलीवूडपटासाठी ऑडीशन देताना अदाची ‘अदा’ 

अदा शर्माने हा पेहराव तिच्या हॉलीवूड सिनेमासाठी केला असून याकरता ऑडिशन देण्यासाठी भाजी विक्रेतीची भूमिका ती साकारत आहे. यामध्ये अदाला खरीखुरी भाजीवालीचा पेहराव करून आपल्या भूमिकेत तो जीवंतपणा आणायचा होता. त्यामुळे अशा प्रकारचा गेटअप तिने केल्याचे बोलले जाते. या हॉलीवूडपटात अदा प्रमुख भूमिकेत दिसणार असून तिच्या या ऑडिशनमुळे निर्माते समाधानी असून तिची सिनेमातील भूमिकेसाठी नक्कीच निवड करतील, असे बोलले जाते. मात्र अदाच्या या हटके लूकमुळे तिचे चाहते चांगलेच गोंधळले असून हे सर्व फोटो झपाट्याने व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

किकि डान्स झाला होता लोकप्रीय  

काही दिवसांपूर्वी अदाचा किकि डान्स व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. क्लासिकल डान्सच्या पेहरावात असलेल्या अदाने गाडीतून उतरून क्लासिकल डान्सच्या पद्धतीनेच किकि डान्स केला होता. हा व्हिडिओ तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या किकि डान्समध्ये आपल्या स्वॅग आणि स्टाइलने चाहत्यांना भुरळ पाडणारी ही अभिनेत्री अशा भाजी विकण्याच्या पेहरावात जेव्हा दिसते तेव्हा सगळ्यांना नक्कीच आश्चर्याचा धक्का बसतो. मात्र एका सिनेमाच्या ऑडीशनसाठी केलेला हा पेहराव अदाच्या कामाप्रती असलेल्या आत्मियतेची साक्ष देते. तिच्या या कष्टाची दखल घेऊन हॉलीवूडपटात अदाला संधी मिळेल अशी आशा भारतीय करत आहेत. अद्याप या प्रोजेक्टविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नसून लवकरच याची अधिकृत घोषणा होईल ही अपेक्षा आहे.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -