घरमनोरंजनआलिया भट्ट, पूनम पांडेनंतर उर्फी जावेदनेसुद्धा केलं रणवीरचं समर्थन

आलिया भट्ट, पूनम पांडेनंतर उर्फी जावेदनेसुद्धा केलं रणवीरचं समर्थन

Subscribe

रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूट विवादात आत्तापर्यंत अर्जुन कपूर, आलिया भट्ट, उर्फी जावेद, परिणीती चोप्रा, मसाबा गुप्ता, प्रियांका चोप्रा, दीया मिर्जा, पूनम पांडे या कलाकारांनी रणवीरचं समर्थन केलेलं आहे

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मागील काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. एका मॅगजीनसाठी त्याने हे फोटोशूट केलं होतं. यावेळी त्याने वेगवेगळ्या पोज दिल्या होत्या. ज्यामुळे सोशल मीडियावरही त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली, शिवाय काही जणांनी तर त्याच्या अतरंगी फोटोंवर मिम्स सुद्धा तयार केले. दरम्यान आता, रणवीर सिंहच्या समर्थन करण्यासाठी अनेक कलाकार त्याची पाठराखण करु लागले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता अर्जुन कपूर अभिनेत्री आलिया भट्ट यांनी रणवीरची पाठराखण केलेली होती. आता या यादीत उर्फी जावेदचं नाव देखील जोडलं गेलं आहे. उर्फीने रणवीर सिंहला ट्रोल करणाऱ्यांची शाळा घेतली आहे. याशिवाय तिने रणवीरची तक्रार करणाऱ्यांन विरोधात देखील आपलं मत मांडलं आहे.

उर्फीने घेतली शाळा
उर्फी वारंवार तिच्या अनोख्या फॅशनमुळे ओळखली जाते. तिच्या या अनोख्या स्टाईलमुळे ती अनेकदा सोशल मीडिया ट्रोल देखील होते. मात्र ती ट्रोलर्सना सडेतोड उत्तरं देत असते. आता यावेळी उर्फीने रणवीर सिंहच्या न्यू़ड फोटोशूटबाबत आपलं मत मांडलं आहे. नुकत्याच एका इंटरव्यूमध्ये उर्फी जावेदने रणवीर सिंहला ट्रोल करणाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली आहे. उर्फी जावेदने सर्वात आधी रणवीरवर तक्रार करणाऱ्या प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावेळी ती म्हणाली की, एनजीओ वाले म्हणत होते की, रणवीरच्या फोटोंमुळे महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. मी त्यांना विचारू इच्छिते की जेव्हा एका स्त्रीला ट्रोल केलं जातं, तेव्हा हे लोक कुठे जातात? उर्फी जावेदच्या या वाक्यांमुळे रणवीरचे चाहते खुश झाले आहेत.

- Advertisement -

रणवीर सिंहला या कलाकरांचा देखील सपोर्ट
रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूट विवादात आत्तापर्यंत अर्जुन कपूर, आलिया भट्ट, उर्फी जावेद, परिणीती चोप्रा, मसाबा गुप्ता, प्रियांका चोप्रा, दीया मिर्जा, पूनम पांडे या कलाकारांनी रणवीरचं समर्थन केलेलं आहे.

चेंबुरमधील स्वयंसेवी संस्थेने केली तक्रार

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

- Advertisement -

रणवीर सिंहने भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केले तसेच महिलांच्या भावनाही दुखावल्याने चेंबुरमधील एका स्वयंसेवी संस्थेने रणवीर सिंह विरोधात चेंबुर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे. त्या स्वयंसेवी संस्थेच्या मते, “भारत संस्कृतीचे जतन करणारा देश आहे. या देशातील प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे. भारतात अभिनेत्याला नायक म्हटले जाते. चाहते त्यांच्या लाडक्या कलाकारांना फॉलो करतात. त्यामुळे रणवीर सिंहने न्यूड फोटोशूट करू नये. असं तक्रारीत चेंबुरमधील स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे. या संस्थेने रणवीर सिंहवर कलम २९२,२९३, ३५४ आणि ५०९, ६७अ हे कलम लावण्यात आले आहेत.


हेही वाचा :राकेश आणि शमिता यांनी दिला नात्याला पूर्णविराम; सोशल मीडियावर केली घोषणा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -