घरदेश-विदेशIRCTC घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादवांचे निकटवर्तीय भोला यादवला CBI ने केली...

IRCTC घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादवांचे निकटवर्तीय भोला यादवला CBI ने केली अटक

Subscribe

बिहारच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. आरजेडी सुप्रीमो लालू यादव यांचे निकटवर्तीय भोला यादव यांना सीबीआयने अटक केली आहे. आयआरसीटीसी घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात सीबीआयने कारवाई केली आहे. भोला यादव हे राजदचे आमदार आहेत. भोला यादव हे लालू यादव यांचे ओएसडीही राहिले आहेत. हे प्रकरण नोकरीसाठी जमीन आणि IRCTC घोटाळ्याचे आहे. चार दिवसांपूर्वी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, ते गेले नाही. भोला यादवच्या पाटणा आणि दरभंगा येथील घरांवर बुधवारीही छापे टाकण्यात आले.

सीबीआयचा घरावर छापा –

- Advertisement -

सीबीआयच्या पथकाने बुधवारी सकाळी आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय आणि बहादूरपूरचे आमदार भोला यादव यांच्या घरावर छापा टाकला. सीबीआयचे पथक सकाळी सहा वाजता माजी आमदारांच्या गंज येथील निवासस्थानी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. खोलीचे कुलूप दिसले असता केअरटेकरला चावीबाबत चौकशी केली असता. केअरटेकर प्रशांतने सांगितले की, जवळच्याच एका कामगाराकडे घराच्या चाव्या आहेत. काही क्षणातच कामगार ललित यादव यांना बोलावण्यात आले.

ललितने घराच्या चाव्या दिल्या. यानंतर पाच सदस्यीय पथकाने सर्व खोल्यांची झडती घेतली. परंतु, तेथे काहीही आढळून आले नाही. सुमारे दोन तास चाललेल्या छाप्यानंतर सीबीआय अधिकाऱ्यांनी एक कागद आणि त्याची डुप्लिकेट कॉपी  तयार केली. त्याची प्रत भोला यादवच्या कार्यकर्त्याला दिल्यानंतर आठ वाजता पथक परतले. अचानक आणि छुप्या छाप्याची माहिती आसपासच्या लोकांनाही मिळाली नाही. रेल्वे भरती घोटाळ्याप्रकरणी छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -