घरमनोरंजनबिग बॉस फेम 'ही' अभिनेत्री घटस्फोटनंतर पुन्हा पडली प्रेमात

बिग बॉस फेम ‘ही’ अभिनेत्री घटस्फोटनंतर पुन्हा पडली प्रेमात

Subscribe

बिग बॉस मराठी २ मधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे रूपाली भोसले. बिग बॉसच्या घरातील संयमी, शांत म्हणून रूपाली प्रेक्षकांची आवडती झाली. घरातील पराग कान्हेरेमुळे देखील रूपाली अनेकदा चर्चेत आली. बिग बॉसच्या घरात असताना तीच्या बोकण्यातून सगळ्यांना समजले की रूपाली भोसलेचा घटस्फोट झालेला आहे. पण आता रूपाली पुन्हा प्रेमात पडली असच दिसतय. नुकताच रूपालीने आपल्या बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो सोशलमिडीयावर शेअर केला आहे.

- Advertisement -

रूपाली सोशलमिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात असते. इन्स्टाग्रामवर रूपाली खूप अॅक्टीव्ह आहे. नुकताच रूपालीने बॉयफ्रेंड अंकितबरोबर फोटो शेअर करत मी तुझी प्रिन्सेस आहे असं म्हटलं आहे. रूपालीचा बॉयफ्रेंड अंकित मगरे हा फिल्ममेकर आहे त्याचबरोबर अंकित सेलेब्रेटी पीआर देखील आहे. अंकितने देखील आपल्या सोशलमिडीया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

- Advertisement -

या आधी रूपालीने लंडनस्थित असणाऱ्या एका मुलाशी लग्न केले होते. त्याचा अभिनयाशी काही संबंध नव्हता. तो एक बिझनेसमन होता. लग्नाच्या ७ वर्षानंतर रूपालीचा घटस्फोट झाला. त्यानंतर ती भारतात परत आली. रूपाली बिग बॉसच्या घरात अनेकवेळा आपल्या कुटूंबाद्दल, नात्याविषयी बोलताना दिसली. तीच्या बोलण्यावरून रूपालीसाठी कुटूंब किती महत्त्वाच आहे हे आपल्याला समजलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -