घरमनोरंजन'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार 'जिजाऊ'

‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत ‘ही’ अभिनेत्री साकारणार ‘जिजाऊ’

Subscribe

'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत जिजाऊंची तरूणपणाची भूमिका साकारताना दिसणार

सध्या टेलिव्हिजन विश्वात ऐतिहासिक मालिकांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेनंतर आता आणखी एक ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज आहे. डॉ. अमोल कोल्हे यांची निर्मिती संस्था जगदंब क्रिएशनने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून जिवंत इतिहास उभा केला. या मालिकेमुळे अनेकांना पुन्हा ऐतिहासिक घटना जाणून घेणं शक्य झालेच परंतु नव्याने इतिहासाची आवड निर्माण झाली.

- Advertisement -

ही नवी मालिका जगदंब क्रिएशनची असून तिचे नाव ‘स्वराज्यजननी जिजामाता’ असे आहे. ही मालिका १९ ऑगस्टपासून सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणार असून या मालिकेत जिजाऊंची भूमिका अमृता पवार ही अभिनेत्री साकारणार आहे.

अमृता पवार या अभिनेत्रीने ‘दुहेरी’ या मालिकेत काम केले असून ‘ललित २०५’ या मालिकेत तिनं भैरवीची भूमिका साकारली होती. आता ही अभिनेत्री ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत जिजाऊंची तरूणपणाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

- Advertisement -

शहाजीराजांची स्वराज्यसंकल्पना ज्यांनी जपली, जोपासली आणि स्वराज्यसंस्थापक शिवरायांना घडवलं त्या जिजाऊ मासाहेबांचं जीवनचरित्र या मालिकेच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -