घरमनोरंजनVideo: अगं बाई...ऐश्वर्याने लाजत गायलं 'हे' गाणं

Video: अगं बाई…ऐश्वर्याने लाजत गायलं ‘हे’ गाणं

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सोशल मीडियावर जास्त अॅक्टीव्ह नसली तरी तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. सध्या ऐश्वर्या रायचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या आपल्या गाण्याचे कौशल्य दाखवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या ‘तेरी याद हमसफर सुबह शाम’ हे गाताना दिसत आहे.

- Advertisement -

ऐश्वर्या राय बच्चनचा हा जुना व्हिडिओ सिंगिंग सुपरस्टारने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. तिने गायलेले हे पाहून सगळे चाहते थक्क होऊन तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या रायने तिचा ४६ वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन निमित्ताने ऐश्वर्या ही अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्य सोबत एकत्र दिसली.

View this post on Instagram

✨❤️MINE?✨?????LOVE

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

- Advertisement -

बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन २०११ मध्ये गर्भवती झाल्यामुळे चित्रपटांमधून ब्रेक घेतला. नंतर २०१५ मध्ये संजय गुप्ताच्या ‘जज्बा’ या चित्रपटाद्वारे तिने कमबॅक केला होता. ऐश्वर्याचे ‘ऐ दिल है मुश्किल’ (२०१६) आणि २०१८ मध्ये आलेला ‘फन्ने खान’ अशा दोन चित्रपटात दिसली. ‘गुलाब जामुन’ या आगामी चित्रपटात ऐश्वर्या दिसणार असल्याचे म्हटलं जातं आहे. यात तिच्यासोबत पती अभिषेक बच्चनचीही भूमिका आहे.


हेही वाचा – ‘या’ अभिनेत्रीचा योगा पाहून तुम्ही व्हाल थक्क; सोशल मीडियावर फोटो व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -