घरमनोरंजनअक्षयने घेतला टायगर श्रॉफचा बदला; व्हिडीओ व्हायरल

अक्षयने घेतला टायगर श्रॉफचा बदला; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफ सध्या त्यांच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचे अनेक चित्रपट आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय ज्यामध्ये अक्षय कुमारने टायगर श्रॉफसोबत प्रँकचा केल्याचे दिसत आहे.

अक्षयने केला टायगरसोबत जबरदस्त प्रँक

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

सध्या खूप व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अक्षय हवेत उडी मारताना आणि टायगर श्रॉफच्या हातांवर बसलेला दिसत आहे. त्यानंतर तो टायगर श्रॉफलाही असे करण्यास सांगतो. मात्र, यावेळी टायगर श्रॉफ उडी घेताच. त्यांच्यासोबत अक्षय एक जबरदस्त प्रँक करतो.

- Advertisement -

टायगर श्रॉफने हवेत उडी मारताच अक्षय कुमार तिथून निघून गेला. अक्षय आणि टायगरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यावर अनेक चाहते तसेच कलाकार देखील कमेंट्स करताना दिसत आहेत.

- Advertisement -

कतरिना कैफची कमेंट चर्चेत

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच टायगर श्रॉफने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हसणारा इमोजी शेअर केला आणि लिहिले की, ‘याचा बदला घेतला जाईल… बडे.” अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर कतरिना कैफने देखील प्रतिक्रिया दिली आहे. तर टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफनेही या व्हिडिओवर कमेंट केली आहे.

 


हेही वाचा : Kriti-Pulkit Wedding : पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा अडकले लग्नबंधनात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -