घरमहाराष्ट्रSanjay Raut : गॅरंटी तेच नाही तर आम्हालाही देता येते, राऊतांच्या भाजपाला...

Sanjay Raut : गॅरंटी तेच नाही तर आम्हालाही देता येते, राऊतांच्या भाजपाला टोला

Subscribe

एनडीएचा 300 पारची घोषणा हळूहळू 200 च्या खाली येणार आहे. पण इंडिया आघाडी ही कमीत कमी 300 च्या वर जागा जिंकणार आहे, असे म्हणत राऊतांनी भाजपाला टोला लगावला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्याबाबत जे काही सर्व्हे येत असतील, त्याने काहीच फरक पडत नाही. आता एनडीएचा 300 पारची घोषणा हळूहळू 200 च्या खाली येणार आहे. पण इंडिया आघाडी ही कमीत कमी 300 च्या वर जागा जिंकणार आहे, असा आम्हाला विश्वास आहे, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. गॅरंटी फक्त तेच नाही तर आम्हीही देऊ शकतो. काही दिवसांनंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा स्वतः येऊन भाजपा 200 जागांवर जिंकली तरी तालेल असे म्हणतील, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. आज (ता. 17 मार्च) प्रसार माध्यमांशी बोलताना इंडिया आघाडीच्या सत्तेबाबत विश्वास व्यक्त केला आहे. (We can also guarantee victory, Sanjay Raut’s criticism of BJP)

हेही वाचा… Rahul Gandhi : देशात कौशल्य आणि दलाल यांच्यात संघर्ष, धारावीत राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून “अब की बार मोदी सरकार 400 पार” अशी घोषणा देण्यात आली आहे. पण काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 300 पारची घोषणा दिली. याबाबत आज खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, हळूहळू आता भाजपावाले 200 जागांवर येणार आहेत. जे काही सर्व्हे येत आहेत, त्याने काही फरत पडत नाही. पण इंडिया आघाडी कमीत कमी 300 जागांवर विजयी होणार. तर भाजपा 220 जागांचा आकडा पण ओलांडू नाही शकणार. ही आमची गॅरंटी आहे, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

तर, गॅरंटी केवळ मोदीच नाही देऊ शकत, तर आम्हीही देऊ शकतो. महाराष्ट्रात आम्ही 40 जागा जिंकणार. बिहारमध्येही 35 पेक्षा अधिक जागा जिंकू. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या स्वतंत्र लढत असल्यातरी त्या इंडिया आघाडीसोबत आहेत. अमित शहा यांनी 300 जागांची घोषणा केली आहे. पण लवकरच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे 200 जागा मिळाल्या तरी खूप आहेत असे सांगतील, अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -