घरमनोरंजनडिलीव्हरीनंतर आलियाचं सर्वात tough शूट; करण जोहरने मागितली माफी

डिलीव्हरीनंतर आलियाचं सर्वात tough शूट; करण जोहरने मागितली माफी

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंह सध्या त्यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून करण जोहर अनेक वर्षांनी दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. मागील काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर समोर आला होता. अशातच करण जोहरने खुलासा केला आहे की, राहाच्या जन्मानंतर आलियाला असे काही करावं लागलं ज्याचा तिला खूप पश्चाताप झाला.

करण जोहरने केला खुलासा

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

करण जोहरने नुकतीच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ‘तुम क्या मिले’ गाण्यातील आलिया भट्ट आणि रणवीर सिंहचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया-रणवीर रोमांस करताना दिसत आहे. या फोटोखाली करणने कॅप्शनने लिहिलंय की, “आलियाने या गाण्यावर काम करण्यासाठी आपला जीव लागला आहे. आलियाचं हे राहाच्या जन्मानंतर पहिलं गाणं होतं आणि मी तिला मनीष मल्होत्राच्या शिफॉन साडीमध्ये कैद केल्याबद्दल माफी मागतो. या शूटनंतर मी खूप आजारी पडलो होतो (कदाचित कर्माचे फळ असेल)”

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

- Advertisement -

करणने पुढे लिहिलं की, “रणवीर सिंहदेखील आपल्या रोमाँटिक गाण्यासाठी लिप सिंक करण्यापूर्वी खूप घाबरला होता, परंतु तो खरोखर आश्चर्यकारक आहे. पण एक चाहता मुलगा, बर्फाचा प्रेमी, शिफॉनच्या साड्या आणि काश्मीरच्या खोऱ्यात रोमान्सला उत्तेजित करणार्‍या सर्व गोष्टींनी मला अधिक प्रभावित केले. त्यामुळे यश चोप्रा यांच्याशी वर्षानुवर्षे संबंध असलेल्या वैभवी मर्चंटने गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले.”

चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित होणार

आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून दोन्ही कलाकारांचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा हा चित्रपट 28 जुलै रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. यात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट व्यतिरिक्त शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन सारखे स्टार्स देखील दिसणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा :

आनंद पंडित आणि पुष्कर जोग घेऊन येत आहेत मैत्रीचा एक अविस्मरणीय प्रवास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -