घरमनोरंजन‘कंचना’ हिंदी रिमेकमध्ये अमिताभ बच्चन दिसणार किन्नरच्या भूमिकेत

‘कंचना’ हिंदी रिमेकमध्ये अमिताभ बच्चन दिसणार किन्नरच्या भूमिकेत

Subscribe

अमिताभ बच्चन या चित्रपटात किन्नरच्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सुपरडूपर हिट तमिळ चित्रपट कंचना या चित्रपटाचा हिंदी रिमेकसह चित्रपट निर्माता राघव लॉरेंस हिंदी चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, कियारा अडवाणी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत पुन्हा बीग बी अमिताभ बच्चन दिसणार आहे. आतापर्यंत आपल्या विवध भूमिकांनी प्रेक्षकांना भुरळ पाडणारे अभिनेते अमिताभ बच्चन आता एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. बॉलिवूडचा हा महानायक दाक्षिणात्य ‘कंचना’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये किन्नराची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटात अमिताभ बच्चन एका तृतीयपंथीय म्हणजेच किन्नरच्या भूमिकेत दिसणार आहे. कंचना या चित्रपटाचा रिमेक हिंदीमध्ये लक्ष्मी बॉमच्या नावाने तयार होत आहे. कंचनाच्या रिमेक संदर्भात दिड वर्षापासून चर्चा सुरू होती, शेवटी या चित्रपटाची सुरूवात झाली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

बीग बी अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या इतर काही कामांमध्ये व्यग्र असल्याने त्यांनी कंचनाच्या चित्रीकरणाला अद्याप सुरुवात केलेली नाही. अशी चर्चा आहे की, अमिताभ बच्चन या चित्रपटात किन्नरच्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -