घरमनोरंजनलग्नासाठी अंकिता लोखंडेने नाकारली होती 'बाजीराव मस्तानी'ची ऑफर

लग्नासाठी अंकिता लोखंडेने नाकारली होती ‘बाजीराव मस्तानी’ची ऑफर

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अंकिता लोखंडे अलीकडे विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी अंकिताने हिंदी बिग बॉस 17 या रियालिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून पती विक्की जैनसोबत सहभाग घेतला होता. यावेळी देखील अंकिता खूप चर्चेत आली होती. दरम्यान, अशातच अंकिता आता संजय लीला भन्साळींच्या एका लोकप्रिय चित्रपटामुळे चर्चेत आहे ज्याची ऑफर अंकिताने नाकारली होती.

अंकिताने नाकारली होती ‘रामलीला’ चित्रपटाची ऑफर

चित्रपट निर्माता संदीप सिंहने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अंकिताच्या रामलीला चित्रपटाच्या ऑफरबद्दल खुलासा केला. यावेळी त्यांनी सांगितलं की, अंकिता लोखंडेने ‘रामलीला’ या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती आणि तिचं सिलेक्शन देखील झालं होतं. परंतु त्यावेळी अंकिता, सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यावेळी तिचे पूर्ण लक्ष तिच्या रिलेशनशिप आणि लग्नावर होते. त्यामुळे तिने करिअरकडे दुर्लक्ष करत ‘हॅप्पी न्यू ईअर’, ‘रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांची ऑफर नाकारली.

- Advertisement -

‘बाजीराव मस्तानी’साठी देखील मिळाली होती ऑफर

एका मुलाखतीमध्ये अंकिताने सांगितलं की, “संजय लीला भंसाळी यांनी ‘बाजीराव मस्तानी’साठी मला ऑफर दिली होती. त्यावेळी त्यांनी स्वतः मला कॉल केला होता आणि म्हणाले होते की, ‘कर हा चित्रपट नाहीतर आयुष्यभर पचतावशील तू’ , त्यावेळी ते माझं खूप कौतुक करत होते. पण मी त्यांना त्यावेळी लग्नाचे कारण सांगत चित्रपटासाठी नकार दिला. तो दिवस मला आजही आठवतो.”


हेही वाचा : अनन्या पांडे आणि आदित्यचं ब्रेकअप? अनन्याची ती पोस्ट चर्चेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -